Noise कंपनी स्मार्टवॉचसाठी लोकप्रिय आहे. नॉइज कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स असलेली स्मार्टवॉच लॉन्च करतच असते. आतासुद्धा नॉईजने खास महिलांसाठी डिझाईन केलेले स्मार्टवॉच ‘नॉइज फिट Diva’ लॉन्च केले आहे. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि नेहमी-ऑन-डिस्प्ले (AoD) यासारख्या फीचर्ससह मेटॅलिक आणि चकचकीत देण्यात आले आहे. यामुळे स्मार्टवॉचचे आकर्षक दिसते. तसेच डायमंड कट डायल हे NoiseFit Diva च्या डिझाइनचे सौंदर्य वाढवते.

नॉइज कंपनीचे अमित खत्री म्हणाले, ” नॉइज फिट दिवा हे स्मार्टवॉच महिलांसाठी काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहे. जे त्यांची वैयक्तिक शैली स्वीकारून चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न करतात. हे स्मार्टवॉच फॅशन आणि टेक्नॉलॉजीचा अगदी सहजपणे सुसंवाद साधते. तसेच सहजतेने एखाद्याची शैली वाढवते ज्यामुळे ती महिलांसाठी उत्कृष्ट शैलीचा साथीदार बनते.” याबाबतचे वृत्त zeebiz ने दिले आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?

हेही वाचा : Tech Layoffs: Amazon ने पुन्हा एकदा केली कर्मचारी कपात, ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना दिला नारळ

नॉइज फिट दिवा महिलांसाठी तयार करण्यात आले आहे जे आपल्या फॅशनशी तडजोड न करता त्याच्याशी कनेक्ट राहतात आणि आपल्या टार्गेट्समध्ये कायम सर्वोच्च स्थानी राहणे पसंत करतात. हे स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग आणि नॉइज बझसह सुसज्ज आहे. जे वापरकर्त्यांना कॉल लॉजमध्ये प्रवेश करण्यास आणि १० कॉन्टॅक्टस सेव्ह करण्याची परवानगी देते. स्मार्टवॉचमध्ये चांगला अनुभव मिळावा म्हणून AoD आणि चांगले रिझोल्युशन असलेला १.१ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

स्मार्टवॉचचे AI व्हॉइस असिस्टंट तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या असिस्टंटला कनेक्ट करू देते. जो सिरी आणि गुगलशी सुसंगत असून वापरकर्त्याच्या अनुभव आणखी वाढवतो. नॉइज फिट दिवा स्मार्टवॉच हेल्थ फीचर्ससह येते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्मार्टवॉचची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर चार दिवस टिकते. त्यामध्ये IP67 पाणी व धूळ प्रतिरोधक देण्यात आले आहे. हे स्मार्टवॉच हार्ट बीट, SpO2, स्लीप मॉनिटर, श्वासोच्छवास आणि महिला सायकल ट्रॅकर यांसारख्या महत्वाच्या गोष्टींचा रेकॉर्ड ठेवते.

नॉइज फिट दिवा स्मार्टवॉचमध्ये १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड येतात. याशिवाय १०० पेक्षा अधिक वॉच फेस देखील यामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये गेमिंगसाठी नॉइज फिट फोकस App चा सपोर्ट आहे. हे स्मार्टवॉच ब्लॅक रंगामध्ये उपलब्ध आहे. हे स्मार्टवॉच केवळ Amazon आणि gonoise.com वर २,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

Story img Loader