Noise two wireless headphones : स्पष्ट आवाजासाठी हेडफोनला प्रचंड मागणी आहे. व्हिडिओ, गाणी एडिट करण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. बाजारात वायरलेस हेडफोन्स देखील मिळतात. ‘नॉइस टू’ने ग्राहकांसाठी १ हजार ४९९ रुपयांमध्ये वायरलेस ओवर इअर हेडफोन्स उपलब्ध केले आहेत. विशेष म्हणजे, हे हेडफोन्स ५० तासांची बॅटरी लाईफसह मिळत आहेत.

दीर्घकाळ हेडफोन वापरता यावा यासाठी हेडफोन्सच्या कप्सना मऊ पॅडिंग देण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हेडफोन्स ५० तासांचा प्लेटाईम देतात, असा कंपनीचा दावा आहे. मात्र, हेडफोनआड येणारे आवाज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणारे अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन तंत्रज्ञान यात नाही.

ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Airtel vs Jio vs Vi Recharge Plans
Airtel vs Jio vs Vi: फक्त कॉल आणि एसएमएस रिचार्जकरिता कोण देत आहे सर्वात स्वस्त प्लॅन? रोजचा खर्च येईल फक्त ५ रुपये
Reliance Jio Rs 458, Rs 1,958 voice and SMS-only plans launched to abide by TRAI’s guidelines
जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ३६५ दिवसांच्या वॅलिडीटीचे ‘हे’ २ सर्वात स्वस्त प्लॅन एकदा पाहाच
Without internet recharge plans Airtel Jio Vi launches voice and sms only recharge plans cheapest prepaid recharge plans
घरात वायफाय असणाऱ्यांसाठी Airtel-Jio-Vi चा जबरदस्त प्लॅन! दिवसाला फक्त ५ रुपये खर्च, जाणून घ्या किंमत किती
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी
Jio, Airtel and Vi Voice and SMS Plan
Voice and SMS Plan : जिओ, एअरटेल की व्हीआय? कोणता रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरेल बेस्ट; वाचा यादी
thief stealing mobile phones from passengers at swargate st station arrested
एसटी स्थानकात प्रवाशांकडील मोबाइल चोरणारा गजाआड; ४३ मोबाइल संच जप्त

(ओप्पोचा स्वस्त 5G फोन झाला लाँच; ८ तास गेमिंग, ५० एमपी कॅमेरासह मिळत आहेत भन्नाट फीचर्स)

किंमत

नॉइस टू वायरलेस हेडफोन्सची किंमत १ हजार ४९९ रुपये आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि गो नॉइस इ स्टोअरवरून तुम्ही हे हेडफोन्स खरेदी करू शकता.

फीचर्स

नॉइस टू वायरलेस हेडफोन्स हे एन्ट्री लेव्हल हेडफोन्स असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ते ब्ल्युटूथद्वारे कोणत्याही स्मार्टफोन, टॅबलेट किंवा संगणकाशी जोडता येतात. फोनमध्ये ड्युएल पेअरिंग फीचर मिळते. या फीचरने हेडफोन लॅपटॉप किंवा स्मार्टफोनशी एकाचवेळी जोडता येऊ शकते.

काय आहे कम्युनिटी फीचर? व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असे करा तयार)

हेडफोन्सना आयपीएक्स ५ रेटिंग मिळाले आहे. या रेटिंगने हेडफोन्स वॉटर रेझिस्टेंट असल्याची खात्री मिळते. हेडफोन्समध्ये ब्ल्युटूथ, ऑक्स, एसडी कार्ड आणि एफएम असे चार मोड देण्यात आले आहेत. चार्जिंगसाठी हेडफोनमध्ये टाइप सी पोर्ट मिळते. हेडफोन्समध्ये ४० एमएम ड्रायव्हर आणि ट्रु बास मिळते. याने तुम्हला प्रत्येक बीट स्पष्ट ऐकू येईल, असा कंपनीचा दावा आहे. तसेच, हेडफोन्समध्ये ४० एमएसपर्यंत लो लॅटेन्सी मिळते. याने गेमिंग किवा चित्रपट पाहताना आवाजात अडथळा येणार नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.

Story img Loader