नोकिया या लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनीने आपला नवीन फोन बाजारामध्ये लॉन्च केला आहे. फिनिश या मोबाइल उत्पादक कंपनी असणाऱ्या HMD ग्लोबलने काल म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी भारतात नोकिया १०५ क्लासिक हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नोकिया १०५ क्लासिक हा फोन चार व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. सिंगल सिम, ड्युअल सिम, चार्जरसह आणि विना चार्जरसह या चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच कंपनीने यामध्ये एक असे फिचर दिले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. HMD ग्लोबल कंपनीने लॉन्च केलेल्या नोकिया १०५ क्लासिक या फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

”आम्ही नवीन नोकिया १०५ क्लासिकसह बाजारपेठेमध्ये आघाडीच्या फीचर फोनमध्ये एक नवीन अपग्रेड लॉन्च करण्यासाठी उत्साहित आहोत. यामध्ये नवीन डिझाइन आणि युपीआय फीचरचा समावेश करण्यात आला आहे” , असे HMD ग्लोबल इंडियाचे व्हाइस प्रेसिडेंट रवी कुंवर यांनी सांगितले. नोकिया १०५ क्लासिक हा फोन चारकोल आणि निळ्या या रंगांमध्ये खरेदीदारांना खरेदी करता येणार आहे. हा फोन भारतातील काही निवडक स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. याबाबतचे वृत्त Business Standard ने दिले आहे.

हेही वाचा : आता X वर देखील घेता येणार ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंग फीचरचा आनंद; कसे वापरायचे? जाणून घ्या

Nokia 105 Classic : फीचर्स

HMD ग्लोबलने नोकिया १०५ क्लासिक फोन लॉन्च केला आहे. यामध्ये इनबिल्ट अशा प्रकारचे UPI अ‍ॅप्लिकेशनचे फिचर देण्यात आले आहे. यामुळे वापरकर्त्यांना या फीचरच्या मदतीने सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने पेमेंट करता येणार आहेत. तसेच फोनमध्ये वायरलेस एफएम रेडिओ अ‍ॅप्लिकेशन आणि लाऊडस्पीकरचे फिचर देण्यात आले आहे. फोनचा आकार कॉम्पॅक्ट आणि मजबूत आहे असे HMD ग्लोबलने सांगितले आहे. नोकिया १०५ क्लासिकमध्ये ८०० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यास हा फोन पूर्ण दिवस वापरता येऊ शकतो असे कंपनीचे म्हणणे आहे.

किंमत

HMD ग्लोबलने भारतात नोकिया १०५ क्लासिक फोन लॉन्च केला आहे. हा फोन चार व्हेरिएंट व दोन रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. सिंगल सिम आणि विनर चार्जरसह येणाऱ्या फोनच्या बेस मॉडेलची किंमत ९९९ रुपये इतकी आहे. भारतातील काही निवडक स्टोअर्समध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia 105 classic luaanch only 999 rs in india with upi app 800 mah battery check features tmb 01