नोकिया मोबाईलचे बिझनेस केअरटेकर एचएमडी ग्लोबलने एकापाठोपाठ एक ५ जी फोन लॉन्च केले आहेत. आता कंपनी आणखी चार नवीन फोन बाजारात आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत रेंडर्ससारखे दिसणारे किमान चार नवीन नोकिया फोन ऑनलाइन लीक झाले आहेत. फोन कधी लॉन्च केले जातील? आणि त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाईल? सध्या स्पष्ट नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टिपस्टर इव्हान ब्लासने या कथित नोकिया फोनची छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत. एक N150DL आणि N1530DL आहे, जे दोन्ही एकमेकांच्या व्हेरियंटसारखे दिसतात. नोकियाच्या दोन फोन मॉडेल्सचं डिझाईना देखील सारखीच आहे. मात्र कोणत्याही विद्यमान नोकिया स्मार्टफोनपेक्षा वेगळी आहे. फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे आहेत जे आयताकृती मॉड्यूलमध्ये आहेत. दोन्ही फोनच्या स्क्रीनवर नॉच आणि बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याचा अर्थ असा होतो की, LCD असू शकतो. त्यामुळे हे बजेट फोन असू शकतात. दोन्हीवर ३.५ मिमी हेडफोन जॅक देखील आहे.

Nokia N151DL हा सध्याच्या सीरिजमधील पुढचा फोन आहे. याच्या मागे वर्तुळाकार कॅमेरा आहे, सध्याच्या नोकिया फोन्ससारखाच आहे. फोनवर कुठेही फिंगरप्रिंट सेन्सर नाही, याचा अर्थ असा होऊ शकतो की N151DL हा एंट्री-लेव्हल फोन आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये खूप जाड नॉच आहे. यासोबतच फोनमध्ये ३.५ मिमी हेडफोन जॅक आहे. नोकियाचा चौथा फोन Nokia N152DL सर्वात स्वस्त डिवाइस असू शकतो. त्याच्या मागे एकच कॅमेरा आहे, जो मध्यभागी ठेवला आहे. नोकियाच्या सी-सिरीज फोन्सप्रमाणेच याची रचना आहे. जर हे खरे असेल तर नोकियाचा हा फोन अँड्रॉइडच्या गो वर्जनसह येऊ शकतो. फोनमध्ये जाड बेझल आहे, नॉच नाही, पंच-होल नाही, फिंगरप्रिंट सेन्सर नाही, परंतु सेल्फी कॅमेरा आणि मागे स्पीकर आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia 4 budget smartphones ready for launch tipster hint rmt