Nokia 6310 Feature Phone: एचएमडी ग्लोबलने काही वर्षांपूर्वी नोकिया ब्रँडला परवाना दिला होता. तेव्हापासून, कंपनी सतत नवीन अवतारांमध्ये क्लासिक नोकिया फीचर फोन लाँच करताना दिसत आहे. त्याच वेळी, कंपनीने काही महिन्यांपूर्वी आधुनिक वैशिष्ट्यांसह लोकप्रिय क्लासिक नोकिया 6310 रिलीज केला होता. तुम्ही फीचर फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला या फोनच्या EMI प्लॅनबद्दल तसेच फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती देणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Nokia 6310 फोन १६५ रुपयांना विकत घ्या

जर आपण Nokia 6310 हा हँडसेट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ई-कॉमर्स साइट Amazon India वर No Cost EMI वर खरेदी करता येईल. त्याच वेळी, जर तुम्ही अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डने फोन विकत घेतला तर १२ महिन्यांच्या ईएमआयवर, दरमहा फक्त १६५ रुपये द्यावे लागतील. मात्र, यामध्ये ग्राहकांकडून वर्षभरासाठी ५१८ रुपये व्याज आकारले जाणार आहे. त्यानुसार ग्राहकांना ३९१७ रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय कंपनी फोनवर एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी सुद्धा देत ​​आहे.

( हे ही वाचा: अरे वाह! ३ महिने मिळतेय Spotify Premium ची मोफत सदस्यता; कसे ते जाणून घ्या)

Nokia 6310 चे तपशील

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर Nokia 6310 मध्ये २.८ इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये UNISOC 6531F प्रोसेसर, ८एमबी रॅम आणि १६एमबी इनबिल्ट स्टोरेज आहे. याशिवाय फोनमध्ये सीरीज 30+ (S30+) ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. त्याच वेळी, Nokia 6310 मध्ये ०.३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे जो LED फ्लॅशसह येतो. फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट उपलब्ध आहे आणि वापरकर्ते ३२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवू शकतात. हँडसेटमध्ये ब्लूटूथ ५.० वाय-फाय, ड्युअल-सिम सपोर्ट आणि एफएम रेडिओसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये ११५०mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी २००१ च्या मॉडेलपेक्षा थोडी मोठी आहे. पण नोकियाचा दावा आहे की यामुळे ७ तासांपेक्षा जास्त टॉकटाइम आणि ३५ दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम मिळेल. फोनमधून बॅटरी काढता येते. फोनसह बॉक्समध्ये चार्जर आणि मायक्रो-यूएसबी केबल उपलब्ध आहेत. नोकिया 6310 चार रंग पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो ज्यामध्ये काळा, निळा, हिरवा आणि पिवळा रंगाचा समावेश आहे. Amazon India आणि कंपनीच्या साईट व्यतिरिक्त, फोनची विक्री ऑफलाइन स्टोअर्सवर होत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia 6310 mobile phone available for rs 165 buy now gps