HMD Global ने आपला नवीन स्मार्टफोन Nokia C21 Plus भारतात लॉंच केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी फोनबद्दल माहिती शेअर करत आहे. नोकिया सी21 प्लसची घोषणा फेब्रुवारीमध्ये करण्यात आली होती. नोकियाच्या या बजेट फोनमध्ये ६.५ इंच HD+ नॉच स्क्रीन, ४ GB पर्यंत रॅम आणि Unisoc SC9863A प्रोसेसर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हँडसेट Android 11 Go Edition सह येतो. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
Nokia C21 Plus specifications
Nokia C21 Plus मध्ये ६.५ इंच (१६००×७२० pixels) HD+ आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. हँडसेट १.६ GHz ऑक्टा-कोर Unisoc SC9863A प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. ग्राफिक्ससाठी IMG8322 GPU आहे. हँडसेटमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असून ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.
Nokia C21 Plus स्मार्टफोन Android 11 Go Edition सह येतो. फोन ड्युअल-सिमला सपोर्ट करतो. हँडसेटमध्ये १३ मेगापिक्सलचा ऑटोफोकस रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. रियर कॅमेरा LED फ्लॅशसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
आणखी वाचा : रिलायन्स जिओ प्लॅनमध्ये १०९५ GB पर्यंत डेटा; अनलिमिटेड कॉल, किंमत फक्त ४१९ रुपयांपासून सुरू
Nokia C21 Plus ला चार्ज करण्यासाठी ५०५० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी १०W चार्जिंगला सपोर्ट करते. फोनची बॅटरी ३ दिवस चालेल असे कंपनीचे म्हणणे आहे. हँडसेटमध्ये ३.५ एफएम ऑडिओ जॅक आणि एफएम रेडिओ देण्यात आला आहे. फोनची परिमाणे १६४.८ x ७५.९x ८.५५ मिलीमीटर आणि वजन ९१ ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी नोकियाच्या या नव्या फोनमध्ये ४ G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 4.2, GPS + GLONASS सारखी फीचर्स आहेत. हा फोन मायक्रो-यूएसबी पोर्टसह येतो.
आणखी वाचा : डिस्प्लेमध्ये कॅमेरा असलेले Red Magic 7S आणि Red Magic 7S Pro आले भेटीला, किंमत जाणून घ्या
Nokia C21 Plus Price
Nokia C21 Plus स्मार्टफोन डार्क निळसर आणि उबदार राखाडी रंगात येतो. हँडसेटच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,२९९ रुपये आहे. तसंच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ११,२९९ रुपयांना लॉंच केले गेले आहे. हा फोन Nokia.com वर उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच तो ई-कॉमर्स साइट्स आणि ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध होईल.
nokia.com वरून Nokia C21 Plus विकत घेतल्यास तुम्हाला मर्यादित कालावधीसाठी नोकिया वायर्ड इयरफोन मोफत मिळतील. Jio ग्राहकांना अतिरिक्त १० टक्के सूट मिळेल. याशिवाय ४ हजार रुपयांचे अतिरिक्त फायदेही मिळतील.