Nokia C31 smartphone launched in india : 10 हजारांच्या आता फोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नोकियाने आपला Nokia C31 स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. या बजेट स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आले असून अनेक फीचर्स मिळत आहेत. या फोनची किंमत काय? आणि त्यामध्ये कोणते फीचर्स मिळत आहेत? याबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर्स

Nokia C31 स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच डिस्प्ले देण्यात आला असून सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच देण्यात आले आहे. स्क्रीनमध्ये जाड बेझल आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेजसह ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आले आहे. फोन अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. फोनमध्ये कमी प्रिलोडे अ‍ॅपसह क्लीन यूआय असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. फोनसह दोन वर्षांचे तिमाही सुरक्षा अपडेट देणार, असे एचएमडी आश्वासन देत आहे.

(Disney+Hotstar, Sony Liv, ५०० चॅनेलचा अ‍ॅक्सेस आणि अमर्यादित इंटरनेट, तेही परवडणाऱ्या किंमतीत, जाणून घ्या प्लान)

नोकिया सी ३१ स्मार्टफोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये १३ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये १० वॉट चार्जिंगसह ५०५० एमएएचची बॅटरी, स्टोअरेजसाठी २५६ जीबी पर्यंतचा मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर, ब्लूटूथ ४.२, वायफाय, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि मायक्रो यूएसबी पोर्ट मिळते.

किंमत

Nokia C31 स्मार्टफोनचा ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज व्हेरिएंट ९ हजार ९९९ रुपये, तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज व्हेरिएंट १० हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. दोन्ही व्हेरिएंट आजपासून नोकिया इंडिया ई स्टोअर आणि पार्टनर रिटेल आऊटलेट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. Nokia C31 चारकोल, मिंट आणि सायन या तीन रंग पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia c31 smartphone launched in india check price and feature ssb
Show comments