Nokia या कंपनीने आपला Nokia T21 हा टॅबलेट आज भारतामध्ये लाँच केला आहे. या टॅबलेटमध्ये १०.३ इंचाचा डिस्प्ले असणार आहे. तसेच नोकिया कंपनी या टॅबवर ३ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आणि २ वर्षांचे OS अपग्रेड करण्याची वॉरंटी देत आहे. एकदा चार्ज केल्यास हा टॅब तीन दिवस वापरता येऊ शकतो.
काय असतील फीचर्स ?
नोकियाचा हा टॅबलेट चारकोल ग्रे या रंगांच्या व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये या टॅबचे इंटर्नल स्टोरेज हे ६४ जीबी असून रॅम ही ४ जीबी इतकी असणार आहे. याचा रियर कॅमेरा हा ८ मेगापिक्सलचा असून, सेल्फी कॅमेरा देखील ८ मेगापिक्सलचा आहे. या टॅबच्या बॅटरीची क्षमता ही ८२००mAh इतकी आहे.
काय असणार किंमत ?
Nokia T21 tablet या टॅबची विक्री २२ जानेवारीपासून सुरु होणार आहे. हा टॅब तुम्ही १७,९९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहेत. तसेच यातलाच Wi-Fi + LTE या मॉडेलचा टॅब तुम्ही १८,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. याचे आधी बुकिंग केल्यास त्यावर १००० रुपयांची सूट देखील ग्राहकांना मिळणार आहे.