Nokia कंपनीने आपला Nokia G42 5G स्मार्टफोन लॉन्च केलं आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम 5G चिपसेटचा सपोर्ट असेल. हा फोन दोन रंगांमध्ये आणि दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये ऑफर केले आहे. नोकियाची मूळ कंपनी HMD चा दावा आहे की, हे मॉडेल परवडणारे, टिकाऊ आहे. म्हणूनच iFixit च्या मदतीने ते डिस्प्ले, बॅटरी आणि चार्जिंग पोर्टसह बदलता येणाऱ्या पार्टसह लॉन्च केला आहे.

Nokia G42 5G चे फीचर्स

नोकीया G42 5G या स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा HD + LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. या फोनला ५६० नीट्सची ब्राईटनेस लेव्हल आणि कॉर्निंग गोरिला ग्लास ३ चे संरक्षण येते. यामध्ये ड्युअल नॅनो सिमचा सपोर्ट मिळतो. नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या नोकियाच्या या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 SoC प्रोसेसर असेल. हा फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. तसेच यात ५ जीबी इतकी व्हर्च्युअल रॅम देखील मिळते. आणि मायक्रोएसडी कार्डद्वारे याचे स्टोरेज १ टीबी पर्यंत वाढवता येते. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत
maharashtrachi hasya jatra show will start again from december prajakta mali shares video
Video : तारीख अन् वेळ ठरली! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार…; प्राजक्ता माळीने शेअर केली सेटवरच्या शूटिंगची झलक
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

हेही वाचा : Amazon Prime Day Sale: अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलच्या तारखा जाहीर; ‘या’ २५ शहरांमध्ये मिळणार…, जाणून घ्या

Nokia G42 5G वर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यामध्ये f/1.8 अपर्चरसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि डेप्थ व मॅक्रो लेन्ससह २ मेगापिक्सलचा सेन्सर समाविष्ट आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Nokia G42 5G मध्ये ५००० mAh क्षमतेच्या बॅटरीसह २०W चे वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. फोन एकदा चार्ज केला की तीन दिवस बॅटरी तिकडते असा दावा करण्यात आला आहे. बायोमेट्रिक्ससाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आले आहे. तसेच हा फोन 4G, 5G, Wi-Fi, NFC, GPS, Bluetooth v5.1 आणि USB Type-C पोर्ट कनेक्टिव्हिटीला देखील सपोर्ट करतो.

iFixit च्या मदतीने नोकिया G42 5G ची बॅटरी, डिस्प्ले आणि चार्जिंग पोर्ट बदलता येऊ शकतात. वापरकर्ते स्थानिक वितर्क किंवा अधिकृत नोकिया वेबसाइटवरून हवे असलेले पार्टस आणू शकतात किंवा ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. हे पार्टस कसे बदलाचे त्याचे प्रात्यक्षिक अधिकृत साईटवर उपलब्ध आहे.

हेही वाचा : ChatGPT आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं हिंदीत देणार; कसे ते जाणून घ्या

Nokia G42 5G सह कंपनी तीन वर्षांचे मासिक सुरक्षा अपडेट आणि दोन वर्षांचे OS अपग्रेड ऑफर करण्याचे वचन देते. फोनचे वजन जे १९३.८ ग्रॅम असून त्याचा आकार १६५ मिमी x ७५.८ मिमी x ८.५ मिमी टीका आहे. Nokia G42 5G हा स्मार्टफोन जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतात या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत लॉन्च होईल. नोकियाने हा फोन So Grey आणि So Purple या रंगांमध्ये ऑफर केले आहेत. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत EUR १९९ (अंदाजे २०,८०० रुपये) इतकी आहे.