Nokia कंपनीने आपले दोन नवीन फिचर फोन बाजारात लॉन्च केले आहेत. कंपनीने Nokia 110 4G आणि Nokia 110 2G हे दोन फिचर फोन कॉम्पॅक्ट डिझाईन आणि मॉडर्न फिनिशसह लॉन्च केले आहेत. कंपनीने Nokia 110 4G आणि Nokia 110 2G मिडनाईट ब्लू(Midnight blue), आर्क्टिक पर्पल(Arctic purple), चारकोल(Charcoal) आणि क्लाउडी ब्लू(Cloudy Blue) रंगांमध्ये उपलब्ध केले आहेत.

नोकिया 110 4G, नोकिया 110 2G चे फीचर्स

नोकिया ११० ४जी आणि नोकिया १० २जी या फोनमध्ये HD व्हॉइस कॉल सपोर्ट मिळतो. हे या दोन्ही फोन्समधील खास फिचर आहे. नोकियाचे डिव्हाईस इंटीग्रेटेड UPI पेमेंट फंक्शनसह लॉन्च करण्यात आले आहे. ज्यामुळे वापरकर्ते स्कॅन आणि पे (Scan and Pay) च्या मदतीने डिजिटल व्यवहार करू शकतात.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?

हेही वाचा : VIDEO: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लॉन्च केले भारत 6G Alliance; जाणून घ्या सविस्तर

Nokia 110 4G आणि Nokia 110 2G फीचर फोन्स बिल्ट इन रिअर कॅमेरासह लॉन्च केले गेले आहे. तसेच या दोन्हीमध्ये SD कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे. ज्याद्वारे ३२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येते. गाणी ऐकण्यासाठी यात म्युझिक प्लेअर आणि वायरलेस FM रेडिओ देखील दिला आहे. त्याशिवाय या फोन्समध्ये स्टोरेजची क्षमता वाढवण्याच्या पर्यायासह ऑटो कॉल रेकॉर्डर दिला आहे. नोकिया 1104G (२०२३) आणि नोकिया 110 2 G मध्ये अनुक्रमे १४५० mAh आणि १००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

(Image Credit-Nokia)

किंमत

कंपनीने नोकिया 110 4G मिडनाईट ब्लू आणि आर्क्टिक पर्पल रंगांमध्ये सादर केला आहे. तर Nokia 110 2G चारकोल आणि क्लाउडी ब्लू रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. नोकियाचे हे दोन्ही फोन्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून, ऑनलाइन पार्टनर स्टोअर अणि रिटेल स्टोअर्समधून खरेदी करू शकता. Nokia 110 4G (2023) फीचर फोन २,४९९ रुपये तर Nokia 110 2G (2023) हा फिचर फोन भारतात १,६९९ रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.