Nokia ही मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधील फार प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीने MWC २०२३ मध्ये आपले नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. नोकियाने आपले G-Series, C-Series चार नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने Nokia G22, Nokia C22 आणि Nokia C32 चे लॉन्चिंग केले. नवीन Nokia G22 साठी कंपनीने iFixit सोबत पार्टनरशिप केली आहे. हा कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे की ज्यामध्ये रिपेरेबिलिटी फीचर येते. नोकियाचे तीनही नवीन स्मार्टफोन पहिल्यांदाच स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आले आहेत . या स्मार्टफोन्सच्या किंमतीबद्दल ,फीचर्स बद्दल जाणून घेऊयात.

Nokia G22 चे फीचर्स

Nokia G22 मध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले येतो. ज्यात एचडी प्लस रिझोल्युशन ऑफर करण्यात आले आहे. डिस्प्ले सेफ्टीसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ३ बसवण्यात आले आहे. वापरकर्त्यांना या फोनमध्ये octa-core Unisoc T606 हा प्रोसेसर व ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU उपल्बध आहे. यामध्ये ४जीबी रॅम आणि १२८ जीबी इतके इंटर्नल स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. यात मायक्रोएसडी सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…

या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये लेटेस्ट जी -सिरीज स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी , २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा वापरकर्त्यांना वापरायला मिळणार आहे. तसेच फ्रंट म्हणजेच सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच Nokia G22 ला पॉवर देण्यासाठी 5050mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी सी-टाईप पोर्ट देण्यात आला आहे. तसेच सेफ्टी फीचर्समध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Nokia G22 grey आणि Blue कलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ३.५ mm ऑडिओ जॅक आणि OZO ऑडिओ सपोर्ट देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, डिव्हाइसमध्ये Dual-SIM, 4G, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ, NFC, GPS, GLONASS सारखी जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत.

हेही वाचा : MWC 2023: Xiaomi ने भारतात लॉन्च केला ५० मेगापिक्सल कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन; किंमत…

Nokia C32 चे फीचर्स

Nokia C32 या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. त्या स्क्रीनचा अस्पेक्ट रेशो हा २०.९ इतका आहे. यामध्ये octa core processor देण्यात आला आहे. तसेच यामध्ये वापरकर्त्यांना ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळणार आहे. तसेच या डिव्हाइसमध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला १०W चा चार्जिंग सपोर्ट मिळतो. नोकिया कंपनीच्या या फँमध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी, २ मेगापिक्सल सेन्सरसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप येतो. सेफ्टीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्या आला असून हा फोन धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधक आहे कारण तो IP52 रेटिंगसह येतो.कनेक्टिव्हिटीसाठी हँडसेटमध्ये ड्युअल-सिम, 4जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि ग्लोनास सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Nokia C22 चे फीचर्स

Nokia C22 स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा फुलएचडी प्लस डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये octa core processor देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. हा स्मार्टफोन Android 13 (Go Edition) सह येतो. Nokia C22 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच कॅमेऱ्याच्या बाबतीमध्ये बोलायचे झाल्यास या फोनमध्ये १३ मेगापिक्सल प्रायमरी आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर असलेले दोन सेन्सर देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि १०W चा चार्जिंग सपोर्ट करते. स्मार्टफोनमध्ये टाईप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. सेफ्टीसाठी यामध्ये मागील बाजूस फिंगरप्रिंट सचांर देण्यात आला आहे. नोकियाच्या या फोनमध्ये ड्युअल-सिम सपोर्ट, 4G, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 5.2, GPS आणि GLONASS सारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आली आहेत.

हेही वाचा : Jammu and Kashmir: हिमवर्षावात अडकलेल्या गर्भवती महिलेची डॉक्टरांनी WhatsApp च्या मदतीने केली प्रसूती, जाणून घ्या

Nokia G22 ,Nokia C32 आणि Nokia C22 ची किंमत

Nokia G22 हा स्मार्टफोन Grey आणि blue रंगांमध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही १७९ युरे (सुमारे १५,७०० रुपये )इतकी आहे. Nokia C32 हा स्मार्टफोन तुम्ही Autumn green, beach pink आणि charcoal colors या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहात. २ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १३९ युरो (सुमारे १२,२००) इतकी आहे. तसेच Nokia C22 हा स्मार्टफोन तुम्ही midnight black आणि sand colour या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहात. २ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १२९ युरो (सुमारे ११,३००)इतकी आहे.

Story img Loader