नोकिया ही अत्यंत लोकप्रिय अशी मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी ज्यात अनेक अपडेट आणि फीचर्स असतील असे नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. नोकियाची मूळ कंपनी HMD ही आहे. नोकियाचे फोन तयार करणाऱ्या HMD ग्लोबल कंपनीने भारतातील ५जी मार्केटमध्ये एक नवीन ५जी स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Nokia G42 5G असे या लॉन्च झालेल्या नवीन स्मार्टफोनचे नाव आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल, किंमतीबद्दल आणि स्पेसिफिकेशनबद्दल आधी जाणून घेऊयात.

लॉन्च झालेला नोकिया G42 5G हा स्मार्टफोन पर्पल आणि ग्रे या दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये १२८ जीबी स्टोरेज वापरकर्त्यांना मिळणार आहे. Nokia G42 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 480 प्लस 5G चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना दोन वर्षांची OS अपग्रेडची ऑफर मिळणार आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Lokstta lokrang Journalism Law Director Documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
Medhansh Trivedi build single seater drone copter
आता चक्क माणसाला घेऊन हवेत उडणार ड्रोन; विद्यार्थ्याचे जबरदस्त इनोव्हेशन पाहून Anand Mahindra ही झाले चकित; म्हणाले…
pimpri traffic police cctv camera surveillance
नियम मोडताय सावधान! ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून वाहनचालकांची तपासणी; तीन कोटी दंड वसूल
Poco C75 and Poco M7 Pro launched in India
Poco C75 : भारतातला सर्वांत कमी किमतीचा ५जी स्मार्टफोन! 50MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह असणार अनेक फीचर्स
OnePlus 13 and OnePlus 13R launch in India
वर्षाची सुरुवात होणार धमाकेदार! स्लिम डिझाइन, शानदार कॅमेरा लेआउटसह OnePlus 13 भारतात होणार लाँच

हेही वाचा : iPhone 15: आज लॉन्च होणार आयफोन १५ सिरीज; कुठे पाहता येणार लाइव्ह इव्हेंट? जाणून घ्या

HMD ग्लोबलचे भारत आणि APAC चे उपाध्यक्ष रवी कुंवर म्हणाले, ” नोकिया जी ४२ ५जी सह आम्ही तुम्हाला एक शाश्वत आणि स्थिर अनुभवाचे वचन देतो. ”

नोकियाच्या या नवीन फोनमध्ये तीन दिवस टिकेल इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये ११ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज तसेच (५ जीबी फिजिकल रॅम आणि ५जीबी व्हर्च्युअल रॅम ) मिळणार आहे. वापरकर्त्यांना ६.५६ इंचाचा गोरिला ग्लास ३ डिस्प्ले मिळेल. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका असणार आहे. तसेच ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देखील फोटोग्राफीसाठी मिळणार आहे.

काय आहे किंमत ?

या स्मार्टफोनचा सेल १५ सप्टेंबरपासून दुपारी १२ वाजता Amazon इंडियावर सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन १५ हजारांपेक्षा कमी किंमतीमधील परवडणाऱ्या ५ जी स्मार्टफोनमधील एक फोन आहे. या स्मार्टफोनची किंमत १२,५९९ रुपये आहे.

Story img Loader