नोकियाने भारतात आपला मजबूत बॅटरीचा T10 टॅबलेट नुकताच लॉन्च केला होता. हा टॅब्लेट आत्तापर्यंत देशात फक्त वाय-फाय प्रकारात उपलब्ध होता. आता HMD Global ने Nokia T10 टॅबलेटची LTE आवृत्ती देखील देशात सादर केली आहे. नवीन टॅबलेट आवृत्तीमध्ये देखील वाय-फाय व्हेरियंट प्रमाणेच वैशिष्ट्ये आहेत. Nokia T10 हा एक बजेट टॅबलेट असून तो बाजारातील Redmi Pad, Moto Tab G62, Realme Pad इत्यादी उपकरणांशी स्पर्धा करेल.
Nokia T10 तपशील
Nokia T10 मध्ये ८-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. जो १२८० x ८०० पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. टॅबलेट Netflix HD साठी प्रमाणित आहे. डिव्हाइस Unisoc T606 चिपसेटद्वारे सपोर्ट करतो. हा Android 12 OS वर चालतो.
फोटोग्राफीसाठी टॅबलेटच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो ८ मेगापिक्सल सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टॅबलेट डिवायस २ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी या टॅबमध्ये स्टीरियो स्पीकर, ३.५ एमएम जैक आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट मिळतो. एलटीई व्हेरियंट प्रॉक्सिमिटी सेन्सरने सुसज्ज आहे. हा केवळ ओशन निळ्या रंगामध्ये येतो.
आणखी वाचा : Vivo कंपनी डिसेंबरमध्ये सादर करणार ‘ही’ जबरदस्त मोबाईल सिरीज; जाणून घ्या फिचर्स आणि बरचं काही…
Nokia T10 बॅटरी
हा टॅबलेट ३ जीबी /४जीबी रॅम आणि ३२जीबी/६४जीबी इनबिल्ट स्टोरेजसह येतो. मायक्रोएसडी कार्ड जोडण्यासाठी डिव्हाइसवर हायब्रिड सिम स्लॉट आहे. हे USB-C पोर्टद्वारे १०W चार्जिंग सपोर्टसह ५,२५०mAh बॅटरीद्वारे सपोर्ट करत आहे.
किंमत
Nokia T10 LTE व्हेरियंटच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,७९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,७९९ रुपये आहे. १५ ऑक्टोबरपासून नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवर हा नोकिया टॅबलेट खरेदीसाठी उपलब्ध होईल.