फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर जवळपास प्रत्येकजण करत असतो. लोक सर्व प्रकारच्या सोशल मीडिया खात्यांसाठी किंवा बँक खात्यांसाठी पासवर्ड वापरतात. अगदी लोकांच्या फोनचे लॉकही नंबरमध्ये आहेत. पण आता एका सिक्युरिटी फर्मने वीस धोकादायक पासवर्डची यादी जारी केली आहे. जर तुमचेही पासर्वड या यादीतील असेल तर आताच ते पासर्वड बदलून टाकणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला ते महागात पडू शकते.

NordPass ने दिली पासवर्डची यादी

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती? जन्मराशीनुसार तुम्हाला पावणार आज भगवान विष्णू व देवी लक्ष्मी; वाचा राशिभविष्य

NordPassने २०२२ च्या सर्वात सामान्य पासवर्डची यादी शेअर केली आहे. यामध्ये भारतातील ३.५ लाख लोक साइन अप करताना त्यांच्या पासवर्डमध्ये हे पासवर्ड वापरतात. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, ७५ हजारांहून अधिक भारतीय त्यांच्या पासवर्डसाठी बिगबास्केट वापरत आहेत भारताशिवाय इतर ३० देशांमध्येही हे संशोधन करण्यात आले. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, अनेक लोक गेस्ट, व्हीआयपी, १२३४५६ सारखे पासवर्ड वापरतात. दरवर्षी संशोधकांना हा पॅटर्न लक्षात येतो की, क्रीडा संघ, चित्रपटातील पात्रे आणि खाद्यपदार्थ पासवर्डच्या यादीत शीर्षस्थानी असतात. लोक या श्रेणींमध्ये लोकप्रिय नावे वापरतात. हे अतिशय कमकुवत पासवर्ड आहेत आणि हॅकर्सचे काम सोपे होते. अशा परिस्थितीत तुम्हीही असा कमकुवत पासवर्ड वापरत असाल तर लगेच बदला. वापरकर्त्यांना अधिक संयोजनांसह पासवर्ड वापरण्याचा सल्ला दिला जातो.

आणखी वाचा : जबरदस्त ऑफर! फक्त २० हजाराच घरी आणा iPhone 11; पाहा कुठे मिळतेय ही ऑफर

सर्वात सामान्य पासवर्डची यादी
या वर्षीच्या टॉप-२० कॉमन पासवर्डमध्ये 123456, bigbasket, password, 12345678, 123456789, pass@123, 1234567890, anmol123, abcd1234 आणि googledummy यांचा समावेश आहे. हजारो लोक हे पासवर्ड वापरतात.

  • password
  • 123456
  • 12345678
  • bigbasket
  • 123456789
  • pass@123
  • 1234567890
  • anmol123
  • abcd1234
  • googledummy
  • Indya123
  • qwerty123
  • sahilji1
  • 987654321
  • kapil*12345
  • 123456789a
  • p@ssw0rd
  • India@123
  • india123
  • 12345

असा ठेवा पासवर्ड

पासवर्ड लांब ठेवा आणि त्यात चिन्हे, संख्या आणि अक्षरे वापरा. असा पासवर्ड लक्षात ठेवण्यात अडचण येते. परंतु, डेटा सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे. प्रत्येक खात्यासाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा. त्यामुळे हॅकर्सना पासवर्ड क्रॅक करणे सोपे जात नाही. याशिवाय वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा. अधिक सुरक्षिततेसाठी, तुम्ही द्वि-घटक प्रमाणीकरण वापरू शकता.