सिनेमासोबतच ओटीटी कंटेंटच्या फॅन फॉलोइंगमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे, परंतु या कंटेंटचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मची मेंबरशिप घ्यावी लागते आणि त्यासाठी भरमसाठ पैसेही खर्च करायला लागतात. काहींची किंमत कमी असली तरी, सर्व प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेणे अनेकांसाठी महाग होते.

जर तुम्ही या कारणामुळे ओटीटी सबस्क्रिप्शन घेऊ शकत नसाल तर असा एक टेरिफ प्लॅन आहे, ज्यामध्ये फ्री डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन, हाय-स्पीड डेटा आणि इतर अनेक फायदे केवळ १५१ रुपयांमध्ये दिले जात आहेत. चला जाणून घेऊया या प्लॅनबद्दल.

हा जिओ किंवा एअरटेलचा प्लॅन नाही तर वोडाफोन आयडिया हा रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनची किंमत केवळ १५१ रुपये असून यामध्ये हायस्पीड डेटासह इतर अनेक फायदे दिले जात आहेत. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइलच्या सबस्क्रिप्शनची वैधता तीन महिन्यांची आहे.

तुमच्या मोबाईलला किती रेंज मिळते? जाणून घेण्यासाठी मोबाईलमध्येच आहे ‘हा’ पर्याय

मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये आणखी अनेक फायदे आहेत. ३० दिवसांच्या वैधतेसह या प्लानमध्ये एकूण ८ जीबी इंटरनेट दिले जात आहे. या प्लानमध्ये यूजर्सना फ्री एसएमएस किंवा अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात नाही. असे म्हणता येईल की हा प्लान फक्त एक चांगला ओटीटी प्लान आहे जो सबस्क्रिप्शन आणि डेटा देत आहे. व्हीआयचा ३९९ रुपयांचा प्लॅनदेखील डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह येतो, जो दैनंदिन डेटा, मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील ऑफर करतो.

Story img Loader