‘Nothing’ ब्रँड लॉन्च झाल्यापासून कंपनीने आपली काही निवडकच प्रॉडक्ट लॉन्च केली आहेत. कंपनी लवकरच आपले नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये Nothing Phone 2 चा समावेश आहे. नथिंग कंपनी त्यांचा Nothing Phone (2) स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. तर हा फोन कधी लॉन्च होणार आहे. यामध्ये कोणकोणते फीचर्स असण्याची शक्यता आहे तसेच लॉन्चिंग इव्हेंट कुठे पाहता येणार आहे. ते जाणून घेऊयात.
कंपनीच्या अधिकृत निवदेनामध्ये नथिंग इंडियाचे Vp आणि जनरल मॅनेजर मनू शर्मा म्हणाले, ”Nothing चे स्मार्टफोन त्यांच्या पारदर्शक डिझाईनसाठी ओळखले जातात. या डिझाईनच्या निर्मितीसाठी चांगल्या इंजिनिअरिंगची आवश्यकता असते. यामुळे भारतात स्मार्टफोन उत्पादनाच्या क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. Nothing Phone 2 भारतात तयार केला जाणार आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो.” याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
हेही वाचा : Xiaomi ने लॉन्च केले ‘हे’ भन्नाट इअरबड्स, ३० तासांची बॅटरी लाईफ आणि…, जाणून घ्या किंमत
Nothing Phone (2) अपेक्षित फीचर्स
Nothing Phone (2) मध्ये मागील फोनपेक्षा ०.१५ इंच इतका मोठा डिस्प्ले देण्यात येणार आहे. म्हणजेच या नवीन फोनचा डिस्प्ले ६.७ इंच इतका असू शकतो. ज्यामध्ये AMOLED पॅनल आणि FHD+ रिझोल्यूशन ऑफर केले जाऊ शकते. Nothing Phone (2) या फोनच्या बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास कंपनीने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, लवकरच लॉन्च होणाऱ्या फोनमध्ये ४७०० mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. यापूर्वी कंपनीच्या सीईओनेही याला दुजोरा दिला होता. नथिंग फोन (2) Qualcomm Snapdragon 8+ Gen1 SoC द्वारे समर्थित असेल. नथिंग फोन (१) प्रमाणेच आगामी स्मार्टफोनला तीन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.
Nothing Phone (2) भारतातील अपेक्षित किंमत
नथिंग फोन (2) भारतामध्ये सुमारे ४० ,००० रुपयांमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा फोन खरेदीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.
कधी लॉन्च होणार ?
Nothing कंपनी त्यांचा आगामी स्मार्टफोन Nothing Phone (2) ११ जुलै रोजी लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन ‘मेड इन इंडिया’ म्हणजेच भारतात तयार केला जाणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या फोनचा ऑनलाईन लॉन्चिंग इव्हेंट कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून थेट प्रसारित केला जाणार आहे तसेच इव्हेंट युट्यूब ला देखील पाहता येणार आहे. हा आगामी स्मार्टफोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट सह येईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.