Carl Pei ने One Plus मधून वेगळं होऊन स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठा धमाका केला आहे आणि Nothing Phone 1 हा वन प्लसचा किलर मानला जात आहे. नथिंग फोन १ अनोख्या डिझाईनसह ३२,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. नथिंग फोन (१) शी स्पर्धा करण्यासाठी बाजारात आधीच अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण नथिंगच्या फोनची किंमत त्यांच्यापेक्षा थोडी जास्त आहे. नथिंग फोन (१) OnePlus Nord 2T, Poco F4 5G आणि iQOO Neo 6 या पैकी किंमत, फीचर्स आणि स्पेसिफीकेशनच्या तुलनेत कोणता फोन चांगला आहे हे जाणून घ्या?
Nothing Phone (1) vs OnePlus Nord 2T vs iQOO Neo 6 vs Poco F4 5G Price
नथिंग फोन (१) ची किंमत ३२,९९९ रुपयांपासून सुरू होते. तर IQ Neo 6 २९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. OnePlus Nord 2T ची किंमत २८,९९९ रुपये आणि Poco F4 5G ची किंमत २७,९९९ रुपयांपासून सुरू होते. हे सर्व स्मार्टफोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पण नथिंग फोन (१) चा बेस व्हेरिएंट सर्वात महाग आहे तर उर्वरित तीन फोनची किंमत जवळपास सारखीच आहे.
Nothing Phone (1) vs OnePlus Nord 2T vs iQOO Neo 6 vs Poco F4 5G Design
नथिंग फोन १ निश्चितपणे डिझाईनच्या बाबतीत सर्वात वेगळा आणि अद्वितीय आहे. यात पारदर्शक बॅक पॅनल आहे आणि डिव्हाईसमध्ये कुठेही प्लास्टिकचा वापर केलेला नाही. हँडसेटच्या पुढील आणि मागील पॅनलवर ग्लास देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे आणि फ्रेम बनवण्यासाठी रिसायकल अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नथिंगचा हा फोन एका अनोख्या ‘ग्लिफ इंटरफेस’सह येतो जो अनेक एलईडी लाईट्सच्या कॉम्बिनेशनने बनवला गेला आहे. हा इंटरफेस नोटिफिकेशन्स, कॉल्स दरम्यान विविध प्रकारचे लायटिंग देतो. जर तुम्ही अद्वितीय डिझाईन असलेला फोन शोधत असाल तर नथिंग फोन (1) तुमच्यासाठी आहे.
दुसरीकडे Poco F4 5G स्मार्टफोनमध्ये ग्लास बॅक पॅनल आहे जो मॅट फिनिशसह येतो. हा फोन ग्रीन आणि ब्लॅक कलरमध्ये घेतला जाऊ शकतो. हँडसेटला काचेचे बॅक पॅनल आहे. पण त्याची साईड फ्रेम प्लास्टिकची आहे. OnePlus Nord 2T मागील पॅनलवर एक गुळगुळीत फिनिशींग आहे. ग्रे शॅडो आणि जेड फॉग कलर ऑप्शनसह हा फोन येतो. त्याची फ्रेम प्लास्टिकची आहे. IQ Neo 6 बद्दल बोलायचे झाले तर हा फोन बाकीच्या तुलनेत पूर्णपणे प्लास्टिकचा आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर नथिंग फोन (1) या सर्वांमध्ये आघाडीवर आहे.
आणखी वाचा : Samsung Galaxy A23 च्या किमतीत कपात, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी
Nothing Phone (1) vs OnePlus Nord 2T vs iQOO Neo 6 vs Poco F4 5G Software
Nothing Phone (1) स्मार्टफोन Android 12 आधारित NothingOS सह येतो. कंपनीने आश्वासन दिले आहे की फोनला ३ वर्षांसाठी सिस्टम अपडेट आणि ४ वर्षांसाठी दर दोन महिन्यांनी सिक्युरिटी पॅच अपडेट मिळतील. डिव्हाईस जवळपास-स्टॉक Android 12 चा अनुभव देतो आणि ब्लॉटवेअर नाही. नथिंगचे सॉफ्टवेअर आणि अद्वितीय हार्डवेअरसह, हा फोन इतरांपेक्षा वेगळा आहे.
दुसरीकडे, इतर फोनला OnePlus Nord 2T, IQ Neo 6 आणि Poco F4 5G मध्ये Android 12 OS मिळेल. IQ Neo 6 ला Funtouch OS, Poco F4 ला MIUI 13 सह Poco लाँचर आणि OnePlus Nord 2T ला OxygenOS मिळतात.
iQoo आणि OnePlus फोन २ वर्षांपर्यंत सिस्टम अपडेट आणि ३ वर्षांपर्यंत सिक्यूरिटी अपडेट देतात. पण Poco F4 5G मधील अपडेटशी संबंधित कोणतीही माहिती नाही.
Nothing Phone (1) vs OnePlus Nord 2T vs iQOO Neo 6 vs Poco F4 5G Performance
नथिंग फोन (1) मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+ चिपसेट देण्यात आला आहे. Qualcomm ने या चिपसेटमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कृपया लक्षात घ्या की वायरलेस चार्जिंग सपोर्ट साधारणत: ७०० सीरीज प्रोसेसरमध्ये उपलब्ध नाही. स्नॅपड्रॅगन 778G+ या विभागातील सर्वात शक्तिशाली नसला तरी ते स्टेबल परफॉर्मेंस देईल, अशी अपेक्षा आहे. MediaTek Dimensity 1300 चिपसेट OnePlus Nord 2T मध्ये उपलब्ध आहे आणि मिड रेंजच्या फोनसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
पण जर तुम्हाला चांगला परफॉर्मन्स हवा असेल तर iQoo Neo 6 आणि Poco F4 निवडता येईल. हे दोन्ही स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट सह येतात.
हे चार स्मार्टफोन १२ GB रॅम आणि २५६ GB इनबिल्ट स्टोरेजसह येतात. नथिंग फोन (१), OnePlus Nord 2T आणि IQ Neo 6 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. दुसरीकडे, Poco F4 मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर बाजूला आहे. Nothing, OnePlus आणि Poco च्या फोनमध्ये NFC सपोर्ट आहे तर IQ Neo ६ मध्ये हा सपोर्ट उपलब्ध नाही.
Nothing Phone (1) vs OnePlus Nord 2T vs iQOO Neo 6 vs Poco F4 5G Display
नथिंग फोन १ हा फोन १२०Hz च्या रीफ्रेश रेटसह ६.५५ इंच फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेसह येतो. दुसरीकडे, OnePlus Nord 2T मध्ये ९०Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.४३ इंच स्क्रीन आहे. ६.६२ इंच फुलएचडी + एमोलेड पॅनल iQ निओ ६ आणि ६.६७ इंच फुलएचडी + AMOLED पॅनेल Poco F4 5G मध्ये उपलब्ध आहे. Poco च्या फोनमध्ये दिलेला स्क्रीनचा रिफ्रेश दर १२०Hz आहे.
Nothing Phone (1) vs OnePlus Nord 2T vs iQOO Neo 6 vs Poco F4 5G Camera
नथिंग फोन (१) मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो ५० मेगापिक्सलच्या दोन सेन्सर्सने सुसज्ज आहे. प्रायमरी सेन्सर OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो. सेकेंडरी कॅमेरा अल्ट्रावाइड सेन्सर आणि मॅक्रो कॅमेरा म्हणून काम करतो.
OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS सह ५० मेगापिक्सेल प्रायमरी, ८ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. Poco F4 5G मध्ये ६४ मेगापिक्सेल, ८ मेगापिक्सेल, २ मेगापिक्सेल सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. हाच कॅमेरा सेटअप iQoo Neo ६ मध्ये देखील उपलब्ध आहे.
नथिंग फोन (१) आणि IQ निओ ६ मध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सेलचा फ्रंट सेन्सर आहे. तर Poco F4 ला २० मेगापिक्सल तर OnePlus Nord 2T ला ३२ मेगापिक्सेल फ्रंट सेन्सर मिळतो.
Nothing Phone (1) vs OnePlus Nord 2T vs iQOO Neo 6 vs Poco F4 5G Battery
नथिंग फोन (१) ला ४५०० mAh बॅटरीचा सपोर्ट आहे जो ३३ W वायर्ड चार्जिंग, १५W वायरलेस चार्जिंग आणि ५W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. मात्र, या फोनचा चार्जिंगचा स्पीड इतर स्मार्टफोनच्या तुलनेत कमी आहे आणि कंपनीने बॉक्समध्ये चार्जरही दिलेला नाही. युजर्सना या फोनसाठी स्वतंत्रपणे वायर्ड किंवा वायरलेस चार्जर खरेदी करावा लागेल. चार्जरची किंमत २,४९९ रुपये आहे.
OnePlus Nord 2T स्मार्टफोनला चार्ज करण्यासाटी ४५०० mAh बॅटरी प्रदान केली आहे, जी ८० W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. दुसरीकडे, Poco F4 मध्ये ६७ W फास्ट चार्जिंगसह ४५०० mAh बॅटरी आहे. iQoo Neo 6 मध्ये ४७०० mAh बॅटरी आहे जी ८०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तिन्ही फोनसह बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध आहे.