अखेर भारतामध्ये बहुप्रतीक्षित असा Nothing Phone (2) लॉन्च झाला आहे. या फोनच्या ठळक आणि महत्वाच्या फीचर्समध्ये ग्लिफ डिझाईन, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 चिपसेटचा सपोर्ट आणि ६.७ इंचाचा डिस्प्ले तसेच ४,७०० mAh क्षमतेच्या बॅटरीचा समावेश आहे. हा स्मार्टफोन विक्रीसाठी Flipkart वर उपलब्ध असणार असून, भारतात देखील प्री-ऑर्डर उपलब्ध आहे.

Nothing Phone (2): स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नथिंग फोन (२) मध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा LTPO OLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटद्वारे समर्थित आहे. यामध्ये कंपनीने १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेंज ऑफर केले आहे. हा फोन ऑप्टिकल इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
CCTV installation completed two years ago but not fully utilized in the city
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…

हेही वाचा : VIDEO: प्री-ऑर्डरवर ३ हजारांचा डिस्काउंट, ५० मेगापिक्सल कॅमेरा; Nothing कंपनीकडून ‘हा’ स्मार्टफोन लॉन्च

फोटोग्राफीसाठी नथिंग फोन (२) मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सेन्सर आणि ५० मेगापिक्सलचा सेन्सरचा समावेश आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ आधारित NothingOS 2.0 वर चालतो. यात ४,७०० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला ४५ W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. केवळ २० मिनिटांमध्ये ० ते ५० टक्के इतका चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. चार्जिंगसाठी USB टाईप -सी पोर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा : iPhone 11 केवळ १,१४९ रूपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, Amazon नाही तर ‘या’ प्लॅटफॉर्मवरून करा ऑर्डर

कधीपासून सुरू होणार सेल ?

नथिंग फोन (२) नुकताच भारतात लॉन्च करण्यात आला आहे. २१ जुलै पासून त्याची विक्री भारतात सुरू होणार आहे. या फोनची सुरूवातीची किंमत ४४,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन खरेदी करणारे जे इच्छुक ग्राहक आहे ते Axix बँक आणि HDFC बँकेचा कार्ड वापरून अगदी कमी किंमतीमध्ये हा फोन खरेदी करू शकतात. या बँक कार्ड्सवर ३,००० रुपयांचा डिस्काउंट ऑफर आहे. यामुळे याची किंमत ४१,९९९ रुपये इतकी होते.

Story img Loader