अखेर भारतामध्ये बहुप्रतीक्षित असा Nothing Phone (2) लॉन्च झाला आहे. या फोनच्या ठळक आणि महत्वाच्या फीचर्समध्ये ग्लिफ डिझाईन, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 चिपसेटचा सपोर्ट आणि ६.७ इंचाचा डिस्प्ले तसेच ४,७०० mAh क्षमतेच्या बॅटरीचा समावेश आहे. हा स्मार्टफोन विक्रीसाठी Flipkart वर उपलब्ध असणार असून, भारतात देखील प्री-ऑर्डर उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Nothing Phone (2): स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
नथिंग फोन (२) मध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा LTPO OLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटद्वारे समर्थित आहे. यामध्ये कंपनीने १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेंज ऑफर केले आहे. हा फोन ऑप्टिकल इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.
फोटोग्राफीसाठी नथिंग फोन (२) मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सेन्सर आणि ५० मेगापिक्सलचा सेन्सरचा समावेश आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ आधारित NothingOS 2.0 वर चालतो. यात ४,७०० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला ४५ W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. केवळ २० मिनिटांमध्ये ० ते ५० टक्के इतका चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. चार्जिंगसाठी USB टाईप -सी पोर्ट देण्यात आला आहे.
Nothing Phone (2) : भारतातील किंमत आणि उपलब्धता
Nothing Phone (2) फोन तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४४,९९९ रुपये आहे. तसेच १२/२५६ जीबी स्टोरे व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. तसेच १२/५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५४,९९९ रुपये असेल. फोन (२) अॅक्सेसरीजमध्ये १,२९९ रुपयांची असणारी केस, ९९९ रुपयांचे स्क्रीन प्रोटेक्टर आणि २,४९९ रुपयांचे पॉवर अॅडॉप्टर यांचा समावेश आहे. तसेच नाथानं फोन (२) २१ जुलैपासून भारतात Flipkart वर दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उप्लब्ध असणार आहे.
Nothing Phone (2) : प्री ऑर्डरवरील ऑफर्स
नथिंग फोन (२) आता भारतात प्री-ऑर्डरसाठी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. प्री-ऑर्डर ऑफरमध्ये Axix Bank आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर ३,००० रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळेल. खरेदीदार फोन (२) ची केस ४९९ रुपये, स्क्रीन प्रोटेक्टर ३९९ रुपयांना, पॉवर अॅडॉप्टर १,४९९ रुपयांना ईअर (स्टिक) ४,२५० रुपयांना आणि ईअर ८,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात.