‘Nothing’ ब्रँड लॉन्च झाल्यापासून कंपनीने आपली काही निवडकच प्रॉडक्ट लॉन्च केली आहेत. कंपनी लवकरच आपले नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये Nothing Phone 2 चा समावेश आहे. Nothing Phone 2 भारतात ani जागतिक स्तरावर आज लॉन्च होणार आहे. नथिंग कंपनीचे सीईओ कार्ल पेई यांनी हँडसेटच्या होम स्क्रीनचा स्क्रिनशॉट सादर केला आहे. फोनची प्री-ऑर्डर कधीपासून सुरू होणार आहे याबाबत Flipkart ने स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात कुठे पाहता येणार लाईव्ह इव्हेंट

Nothing Phone 2 या फोनचा लाईव्ह लॉन्चिंग इव्हेंट भारतामध्ये रात्री ८.३० वाजता सुरू होईल. हा इव्हेंट लोकं कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा त्यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर थेट पाहू शकणार आहेत. हा फोन वापरकर्ते नथिंग ड्रॉप्स पॉप-अप स्टोअर्सद्वारे वैयक्तिकरित्या नथिंग फोन 2 खरेदी करण्यास सक्षम असतील. याची प्री-ऑर्डर आधीपासूनच सुरू झालेली आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

हेही वाचा : VIDEO: Nothing कंपनीचा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन ११ जुलैला भारतात होणार लॉन्च, किंमत आणि फीचर्स एकदा पहाच

Nothing Phone (2): अपेक्षित फीचर्स

दुसऱ्या जनरेशनमधील Nothing Phone 2 मध्ये Snapdragon 8+ Gen 1 SoC दिला जाणार आहे. यामध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले मिळेल व ४,७०० mAh क्षमतेची बॅटरी मिळेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या स्मार्टफोनचे इतर फीचर्स अद्याप उघड झाली नसली तरी लीक आणि अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, यामध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह लॉन्च केला जाईल. तसेच हा फोन Android 13-आधारित NothingOS 2.0 वर असू शकतो.

तसेच नथिंग स्मार्टफोन २ मध्ये रिअर कॅमेरा सेटअपमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी नी IMX890 सेन्सर आणि ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड लेन्सचा समावेश असू शकतो. दरम्यान सेल्फी आणि व्हिडिओसाठी नथिंग फोन २ समोर ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.

हेही वाचा : Nothing Phone (2) स्मार्टफोन प्री- ऑर्डर कसा करावा?

Nothing Phone (2): अपेक्षित किंमत

कंपनीने नथिंग फोन २ च्या अधिकृत किंमतीविषयी घोषणा केलेली नाही आहे. एका जुन्या रिपोर्टच्या माहितीनुसार, हा फोन भारतात ४२,००० किंवा ४३,००० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. अन्य एका लीक झालेल्या रिपोर्टनुसार, हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. त्यात ८/२५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत EUR ७२९ (अंदाजे ६५,६०० रुपये) तर १२/५१२ जीबी स्टोरेजची किंमत EUR ८४९ (अंदाजे ७६,५०० रुपये ) असण्याची शक्यता आहे. अधिकृत किंमती या फोन लॉन्च झाल्यानंतरच समोर येतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nothing phone 2 launch india today how to watch live event expected features and price tmb 01