‘Nothing’ ब्रँड लॉन्च झाल्यापासून कंपनीने आपली काही निवडकच प्रॉडक्ट लॉन्च केली आहेत. कंपनी लवकरच आपले नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये Nothing Phone 2 चा समावेश आहे. Nothing Phone 2 भारतात ११ जुलै रोजी लाॅन्च होणार आहे. नथिंग कंपनीचे सीईओ कार्ल पेई यांनी हँडसेटच्या होम स्क्रीनचा स्क्रिनशॉट सादर केला आहे. फोनची प्री-ऑर्डर कधीपासून सुरू होणार आहे याबाबत Flipkart स्पष्ट केले आहे. नथिंग फोन २ हा ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 SoC द्वारे समर्थित आहे आणि यामध्ये आधीच्या फोनपेक्षा मोठा डिस्प्ले असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नथिंग फोन २ साठी फ्लिपकार्टने जाहीर केले की २९ जून दुपारी १२ वाजल्यापासून या फोनची प्री-ऑर्डर सुरू होणार आहे. प्री-ऑर्डर करण्यासाठी ग्राहकांना २ हजार रुपये डिपॉझिट भरून फोन बुक करू शकतात. डिपॉझिटसाठी भरलेले २ हजार रुपये हे रिफंडेबल असणार आहेत. तसेच प्री-ऑर्डरच्या ऑफरसह कंपनी नथिंग इअर स्टिकवरती ५० टक्के सूट देखील देत आहे. तसेच या फोनच्या प्री-ऑर्डर दरम्यान काही प्रमुख बँकेतून व्यवहार केल्यास आणखी झटपट कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध असतील. तसेच ग्राहक नथिंग अॅक्सेसरीज बॉक्सवर अतिरिक्त ५० टक्के सूट मिळवू शकतात. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

हेही वाचा : Youtube Video Monetization: ५०० सबस्क्रायबर्स असणाऱ्या चॅनेल्सला देखील कमवता येणार पैसे, YouTube ने नियमांमध्ये केले बदल

नथिंग फोन २ , प्री-ऑर्डर केल्यानंतर ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ११ जुलै रात्री ९ वाजल्यापासून २० जुलै रोजी रात्री ११.५९ पर्यंत फ्लिपकार्टवर येऊन तुम्हाला हवा असलेले फोनचा व्हेरिएंट निवडून उर्वरित रक्कम भरावी लागेल.

Nothing Phone (2) मध्ये मागील फोनपेक्षा ०.१५ इंच इतका मोठा डिस्प्ले देण्यात येणार आहे. म्हणजेच या नवीन फोनचा डिस्प्ले ६.७ इंच इतका असू शकतो. ज्यामध्ये AMOLED पॅनल आणि FHD+ रिझोल्यूशन ऑफर केले जाऊ शकते. Nothing Phone (2) या फोनच्या बॅटरीबाबत बोलायचे लवकरच लॉन्च होणाऱ्या फोनमध्ये ४७०० mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. यापूर्वी कंपनीच्या सीईओनेही याला दुजोरा दिला होता. नथिंग फोन (2) Qualcomm Snapdragon 8+ Gen1 SoC द्वारे समर्थित असेल. नथिंग फोन (१) प्रमाणेच आगामी स्मार्टफोनला तीन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.

हेही वाचा : YouTube कंटेंट क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ अ‍ॅपच्या मदतीने अनेक भाषांमध्ये डब करता येणार व्हिडीओ

नथिंग फोन २ ब्लॅक आणि व्हाईट या दोन रंगांमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. नथिंग फोन २ हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकतो. ८जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत EUR ७२९ (अंदाजे ६५,६०० रुपये ) आणि १२/५१२ स्टोरेजची किंमत EUR ८४९ (अंदाजे ७६,५०० रुपये ) असू शकते.