गेल्या वर्षभरापासून AI (Artifical Intelligence) क्षेत्रात वेगाने विकास होतोय. यातून अशा अनेक मशीन्स, अ‍ॅप्स तयार होत आहेत, जी माणसांप्रमाणेच मात्र प्रचंड वेगात काम करतात. त्यामुळे अनेक कंपन्या आता जनरेटिव्ह एआयच्या लाटेवर आरूढ झालेल्या दिसतात. अशाच ChatGPT नंतर नव्या ‘एआय’चे टेकविश्वात पदार्पण झालं आहे. हे नवं एआय तुमचा पीए आणि टीममेटप्रमाणे काम करेल, यामुळे तुमच्या कामातही चांगला फरक दिसून येईल.

प्रोडक्टिव्ह वेब अ‍ॅप्लिकेशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या नोशन लॅब्स इंक कंपनीने सर्वांसाठी जनरेटिव्ह एआय असिस्टंट ‘नोशन एआय’ अ‍ॅप लाँच केले आहे. या माध्यमातून ऑफिसचं काम सोप्प्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात करणे शक्य होणार आहे. यात तुमच्या ऑफिस फाइल्समधील स्पेलिंग्ज किंवा व्याकरणाच्या चुका अथवा मिटिंगसाठी काढलेल्या पॉईंटमधील महत्वाचे मुद्दे काढून देण्याचं काम हे अ‍ॅप करणार आहे. यामुळे कामाच्या वेगात वाढ तर होईलच पण त्यामुळे वेळही वाचेल.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
Mazagon Dock Shipbuilders limited
नोकरीची संधी : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये भरती
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले

नोशन एआयमुळे तुम्हाला कशी मदत होणार?

वापरकर्त्याला एखाद्या विषयावर ब्लॉग लिहायचा असेल तर तर त्याची सुरुवात करताना थोडी अडचण येते. त्यावेळी तुम्ही नोशन एआयच्या माध्यमातून तुमच्या ब्लॉगचा पहिला ड्राफ बनवू शकता. यातील टूल तुम्हाला काही कल्पना पाठवतील त्यातून तुम्ही तुमच्या ब्लॉगचा विषय अधिक चांगल्या प्रकारे मांडू शकता.

कमी वेळात नवीन कल्पना सुचणं हे थोडं अवघड असतं. यावेळी नोशन एआय वापरकर्त्यांना त्यांच्या कल्पनाशक्तींना वाव देण्यास मदत करू शकते. यातील टूल तुम्हाला तुमच्या विषयासंबंधीत काही आयडिया देईल ज्यातून तुम्ही काही चांगल्या प्रॉडक्टिव्ह कल्पनांवर काम करू शकता.

तुमच्या ब्लॉगमधील शुद्धलेखनाच्या चुका, व्याकरणाच्या चुका किंवा अगदी भाषांतरानंतरही काही गोष्टी असो नोशन एआय तुम्हाला लेखनातही मदत करू शकते.

नोशन एआय वापरकर्त्यांना मीटिंग किंवा त्यांच्या कामाशीसंबंधित काही महत्त्वाच्या कागदपत्रांमधील महत्त्वाचे पॉइंटर्स शोधण्याची गरज लागणार नाही. कारण यातील टूल तुम्हाला मीटिंग्ज आणि कागदपत्रांमधील महत्त्वाचे मुद्दे एकाचवेळी काढून देतात. कंपनीच्या मते, नॉशन एआय एक टीममेटप्रमाणे किंवा तुमच्या खासगी सहाय्यकाप्रमाणे काम करते ज्यातून वापरकर्त्यांना दैनंदिन गोष्टी करताना मार्गदर्शन लाभेल. सध्या नोशन एआयसाठी २० लाखांहून अधिक वापरकर्ते साइन अप वेटिंगलिस्टवर आहेत.

नेटफ्लिक्सचा मोठा निर्णय! अ‍ॅमेझॉन प्राईम, हॉटस्टारला टक्कर देण्यासाठी १०० देशांमध्ये कमी केले सबस्क्रीप्शनचे दर

नोशन लॅब्स इंकने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या अ‍ॅपची चाचणी सुरु केली होती. आता यात सर्वांसाठी नवे अपग्रेडेशन करण्यात आले आहे. कंपनीने हे अ‍ॅप्लिकेशन सर्वांसाठी उपलब्ध करुन दिलेले असले तरी आजवर फ्री- मोफत अकाऊंट असलेल्या ग्राहकांना त्याच्या वापरासाठी दरमहा 10 डॉलर्सची रक्कम भरावी लागेल. तसेच सध्या या अ‍ॅपचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रति महिना अतिरिक्त 8 डॉलर इतकी रक्कम भरावी लागेल. कंपनीने म्हटले आहे की, सर्व वापरकर्त्यांना अ‍ॅपच्या फीचर्ससंदर्भात माहिती घेण्यासाठी 20 फ्री एआय क्रेडिट्स मिळतील.

नोटेशन एआय म्हणजे नेमकं काय?

कंपनीच्या मते, नोशन एआयच्या माध्यमातून वापरकर्ते आपल्या क्षेत्राशी संबंधित कल्पना, विचार, मांडू शकतात. त्यानंतर हे विचार आणि कल्पना अधिकाधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहचवल्या जातील, वापरकर्त्यांच्या ज्ञानात त्यामुळे भर पडेल आणि विचारसरणीत चांगला फरक. अनेक नवीन कल्पना वापरकर्त्यांना जाणून घेता येतील. यामुळे कमी वेळात अगदी हुशारीने काम करण्यास मदत होईल.

सॅन फ्रान्सिस्को स्थित Notion Labs Inc या स्टार्ट-अप कंपनीने Notion AI ची निर्मिती केली आहे. या कंपनीची सुरुवात इव्हान झाओ, जेसिका लॅम, सायमन लास्ट, टोबी शॅकमन आणि ख्रिस प्रुचा यांनी केली आहे. त्यांचे वेब अॅप्लिकेशन सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅकओएस, अँड्रॉइड , आयओएस , वेब आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर उपलब्ध आहे.

Story img Loader