आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्डचा ट्रेंड वाढल्याने त्याचा गैरवापर होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. आधारचा गैरवापर होऊ नये यासाठी आता UIDAI ने ई-मेल आयडीसह आधार कार्ड अपडेट करण्याचे सांगितले आहे. याच्या मदतीने तुमचा आधार कुठे वापरला जात आहे हे कळणे सोपे होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. UIDAI ने ट्विट करत ही माहिती दिली आहे. आधारधारकांनी त्यांचा ई-मेल आयडी आधारशी लिंक केल्यास त्यांना मोठा फायदा होईल, असेही UIDAI ने ट्विट करत सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लिंक कसे करणार?

UIDAI ने ट्विट केले आहे की आधार कार्डमध्ये तुमचा ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी आणि लिंक करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राची माहिती https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ वर मिळेल.

आणखी वाचा : आता ई-पॅन कार्ड मोबाईलवर करा डाउनलोड; ‘या’ स्टेप्स फॉलो करा

असा फायदा होणार

तुमचा आधार कोणत्याही गुन्ह्यासाठी वापरला जात आहे काय हे ई-मेल आयडीने आधार अपडेट केल्यानंतर तुम्हाला सहज कळेल.

यासोबतच जिथे जिथे तुमचा आधार वापरला जाईल तिथे तुम्हाला त्याची माहिती मिळेल.

एकदा ई-मेल आयडी आधारशी लिंक झाला की, तुम्हाला त्याच वेळी ई-मेलवर एक संदेश मिळेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now aadhaar card link to email id pdb