भारतात ५जी सेवा लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. ५जी सेवा सुरू होताच, ५जी नेटवर्कवर सुपर फास्ट ५जी इंटरनेट उपलब्ध होईल अशी आशा टेलिकॉम कंपन्या दाखवत आहेत. तर दुसरीकडे मोबाईल वापरकर्ते म्हणत आहेत की, ५जी आणण्यापेक्षा ४जी नेटवर्क चांगले करा. खरं तर, नेटवर्क कव्हरेज अनेक भागात कमी आहे आणि इंटरनेट देखील स्लो आहे. त्यामुळे गरजेवेळी कॉल लागत नसल्याने वापरकर्ते नाराज आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की या नेटवर्क नसलेल्या परिस्थितीतही तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून फोन कॉल करू शकता. तर आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका अप्रतिम फिचरबद्दल सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोनमध्ये नेटवर्क नसल्यास किंवा कमी असल्यास सेल्युलर सेवा कमकुवत होते, परंतु अशा परिस्थितीत व्हॉईस कॉल करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी जे तंत्रज्ञान शोधले गेले आहे त्याला VoWiFi म्हणजेच WiFi कॉलिंग म्हणतात. VoWiFi म्हणजे व्हॉइस ओव्हर वायफाय. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीन टेलिकॉम कंपन्यांनी देशातील त्यांच्या ग्राहकांसाठी ही सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे मोबाइल वापरकर्ते खराब नेटवर्कच्या बाबतीत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहजपणे व्हॉइस कॉल करू शकतात.

( हे ही वाचा: नवीन स्मार्टफोनसाठी पैसे खर्च का करता? जुन्याच फोनच्या सेटिंग्ज बदला, आणि फोन नव्यासारखा बनवा)

वाय-फाय कॉलिंग म्हणजे काय

वाय-फाय कॉलिंग VoWiFi म्हणजे व्हॉइस ओव्हर वायफाय (वायफाय = वायरलेस फिडेलिटी). सहसा, जेव्हा तुमच्या फोनवरून कॉल केला जातो किंवा प्राप्त होतो तेव्हा तो सेल्युलर नेटवर्कद्वारे असतो. VoLTE या तंत्रज्ञानामध्ये व्हॉईस ओव्हर एलटीई (LTE = लाँग टर्म इव्होल्यूशन) च्या एक पाऊल पुढे आहे, या प्रकारात वायफाय नेटवर्कद्वारे कॉलिंग केले जाते, यासाठी सिम नेटवर्कची आवश्यकता नसते. म्हणजेच मोबाईलमध्ये सिग्नल नसला तरी वायफाय कनेक्शनद्वारे कॉल कनेक्ट करता येतो. यासाठी दूरसंचार सेवा कार्यान्वित करण्याबरोबरच मोबाईल फोनमध्ये वायफाय कॉलिंग चालू असणे आवश्यक आहे.

तुमच्या फोनमध्ये वाय-फाय कॉलिंग कसे चालू करावे

  • Android स्मार्टफोन किंवा iPhone दोन्हीमध्ये VoWiFi सक्रिय करण्यासाठी, फोनच्या सेटिंग्ज मेनूवर जा आणि कनेक्शन पर्याय शोधा.
  • येथे तुम्हाला वाय-फाय कॉलिंगचा पर्याय मिळेल, तो एक्टिवेट करा.
  • हे सेटिंग एक्टिवेट केल्यानंतर, मोबाइल फोन कोणत्याही चालू असलेल्या WiFi नेटवर्कशी कनेक्ट करा.
  • येथे VoLTE आणि VoWiFi दोन्ही पर्याय येत असतील तर दोन्ही चालू करा, ते अधिक चांगले होईल.
  • आता तुम्हाला एक सामान्य कॉल करावा लागेल, जर सिग्नल कमकुवत असेल तर फोन आपोआप मोबाइल नेटवर्कवरून वायफायवर स्विच होईल आणि VoWiFi वर कॉल चालू राहील.
  • VoWiFi एक्टिवेट करण्याचा पर्याय स्मार्टफोनच्या प्रत्येक ब्रँडमध्ये भिन्न असू शकतो. यासाठी, फोन सेटिंग्ज उघडणे आणि थेट WiFi कॉलिंग शोधणे चांगले आहे, यामुळे वेळ देखील वाचेल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now calls can be made from the phone even in no network know about this amazing trick gps