बँकेशी संबंधित कोणतेही काम असो, पॅनकार्ड महत्त्वाचा दस्तऐवज आहे. गुंतवणुकीतही त्याचा उपयोग होतो. परंतु अनेकदा प्रत्येक ठिकाणी पॅन कार्डची फिजिकल कॉपी घेऊन जाणं शक्य होत नाही. मात्र, पॅन कार्ड हरवणे तुमच्यासाठी समस्या बनू शकते. अशा परिस्थितीत पॅन कार्ड नसल्यास अनेक कामं अडकू शकतात. आता नागरिक पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि या अर्जाद्वारे थेट ई-पॅन कार्ड डाउनलोड करून ते वापरू शकतात. पॅन कार्डची ई-कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी मोबाईलवर डाउनलोड करणं अतिशय फायद्याचं ठरतं.

ई-पॅन कार्ड म्हणजे काय?
ई-पॅन कार्डला डिजिटल किंवा ऑनलाइन पॅन कार्ड देखील म्हणू शकता. हे तुमच्या पॅन कार्डचे आभासी रूप आहे. ई-पॅन हे पॅन कार्डच्या मूळ प्रतीपेक्षा बरेच चांगले आहे. ते गमावण्याचा धोका नाही. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा पडताळणीसाठी तुम्ही फिजिकल पॅन कार्डप्रमाणे वापरू शकता. विशेष म्हणजे तुम्ही काही मिनिटांत ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. कसे ते जाणून घेऊया.

Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!

आणखी वाचा : ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यास काळजी करू नका, घरबसल्या बनवा डुप्लिकेट लायसन्स; जाणून घ्या सोपी प्रक्रिया

या’ पद्धतीने डाउनलोड करा ई-पॅन कार्ड

ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी सर्व प्रथम आयकर विभागाच्या incometax.gov.in च्या वेबसाइटवर जा.

आयकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या ‘ई-पॅन डाउनलोड करा’ पर्यायावर क्लिक करा.

येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर, आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा.

ते तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकण्यास सांगेल. त्यानंतर, अटी व शर्ती स्वीकारा.

तुम्हाला OTP मोबाईल वर किंवा ई-मेलवर पाहिजे ते निवडा.

तुम्ही अटी आणि शर्ती स्वीकारल्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP एंटर करा आणि सबमिट बटणावर टॅप करा.

त्यानंतर, एक पेमेंट पर्याय उघडेल. येथे तुम्हाला पेमेंट करावे लागेल.

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर ई पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी PDF Download या पर्यायावर क्लिक करा.