स्मार्टफोनमधील सिम कार्ड ग्राहकांची ओळख असते. सिम कार्डमुळे युजर्सना त्यांचा हक्काचा नंबर मिळतो, तर आता मोबाईलमधील या सिम कार्डची जागा नवं तंत्रज्ञान घेणार आहे. ई-सिम ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. ई-सिम आता सिम कार्डची जागा घेणार आहे. त्यामुळे लवकरच ई-सिमचे युग सुरू होईल, अशी अशा एका कंपनीच्या सीईओने व्यक्त केली आहे.

एअरटेल कंपनीचे एमडी गोपाळ विठ्ठल ह्यांनी ग्राहकांना ई-सिम निवडण्याचा सल्ला दिला आहे, तसेच ह्या सिमचे फायदेदेखील त्यांनी सांगितले आहेत. एअरटेलचे एमडी गोपाळ विठ्ठल यांनी ई-सिमच्या फायद्यांविषयी एक ई-मेल पाठवला. त्यांनी यात नमूद केले आहे की, ही ई-सिम चोरीच्या प्रसंगीदेखील उपयोगी ठरू शकते. चोरांना तुमच्या मोबाईलमधील ई-सिम काढता येणार नाही आणि या खास गोष्टीमुळे तुमचा चोरीला गेलेला फोन ट्रॅक करणे सोपे आणि ई-सिममुळे फोन पुन्हा मिळवणे शक्य होणार आहे. तसेच ई-सिम सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही उपकरणावर हे सिम वापरले जाऊ शकते. ज्या एअरटेल युजर्सना आपले सिम कार्ड, ई-सिममध्ये स्विच करून घ्यायचे आहे, त्यांनी एअरटेल थँक्स ॲपद्वारे ही प्रक्रिया करावी, असे त्यांनी नमूद केले आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

ई-सिम आयफोन १२ सीरिजमुळे (iPhone 12) लोकप्रिय झाला. ॲपलने आयफोनमध्ये दोन सिमच्या सुविधा दिल्या होत्या. त्यात ई-सिम आणि नॅनो सिम असे दोन सिमची सुविधा होती. त्यांनतर हे पाहून सॅमसंग (Samsung) , वनप्लस (OnePlus), मोटोरोला (Motorola) आदी इतर कंपन्यांनीदेखील ई-सिम असलेले मोबाईल सादर करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा…व्हॉट्सॲपमध्ये चॅटसाठी येणार AI चे भन्नाट फिचर! ‘या’ युजर्सना मिळणार फायदा…

ई-सिमचे फायदे :

एअरटेलचे सिम ई-सिमवर स्विच केल्याने वापरकर्त्यांना फोनमध्ये नवीन बदल दिसून येतील. ई-सिम वापरकर्त्यांसाठी सर्व गोष्टी अधिक सुरक्षित बनवण्याच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. एअरटेल सिम कार्डच्या बदल्यात ई-सिम स्वीकारून तुम्ही लोकांबरोबर अगदी सहज कनेक्ट होऊ शकता आणि तसेच खास गोष्ट अशी की, फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तुम्हाला ई-सिम फोन परत मिळवण्यास मदत करू शकेल. एअरटेल युजर्सना ई-सिम मोबाईल वापरण्यासाठी हा एक अनोखा अनुभव ठरेल.

ई-सिम म्हणजे काय?

ई-सिमला एम्बेडेड सिमदेखील म्हणतात. हे डिजिटल सिम डिव्हाइसमध्ये एम्बेड केलं जातं. फिजिकल सिमप्रमाणे हे डिव्हाइसच्या सिम स्लॉटमध्ये टाकण्याची गरज नाही. हे थेट डिव्हाइसमध्ये एम्बेड केलं जातं. ह्यात एक सॉफ्टवेअर असतं, जे कोणत्याही डिवाइसच्या ईयूआयसीसी (eUICC) चिपवर इन्स्टॉल होतं. तर अशाप्रकारचे एअरटेलचे एमडी गोपाळ विठ्ठल ह्यांनी ई सिमचे फायदे सांगितले आणि सल्ला दिला आहे की, युजर्सनी ई-सिमची निवड केली पाहिजे.