प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना मार्च २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत समाविष्ट असलेल्या सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना पाच किलो अन्नधान्य मोफत देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. सरकारच्या या योजनेची चर्चा होत आहे कारण, या योजनेशी ८० कोटी लोक थेट जोडले गेले आहेत. सरकारने देशभरात जारी केलेल्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणे आता सोपे होणार आहे. आता रेशनकार्ड व्यतिरिक्त मोफत रेशन योजनेंतर्गत आधार कार्डद्वारेही तुम्हाला रेशन घेता येणार आहे. या संदर्भात युआयडीने ट्विट करत माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युआयडीने ट्विट करत सांगितले की, आता देशभरात आधार कार्डद्वारे रेशन घेण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. ‘वन नेशन वन आधार’ कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्डवरून देशभरात रेशन घेऊ शकता. पण या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असल्याचेही युआयडीने सांगितले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरात मोफत राशन आणि स्वस्त राशन दिले जाते, मात्र आता UIDAI ने देशातील करोडो लोकांना एक मोठी भेट दिली आहे.

आणखी वाचा : WhatsApp ने आणले नवीन फीचर; आता तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅटवर पाहता येणार इतरांचे स्टेट्स

जवळच्या आधार केंद्रावर संपर्क साधा

तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्राशी संपर्क साधू शकता. याशिवाय, अधिकृत वेबसाइट https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ द्वारे देखील आधार केंद्र शोधता येईल.

टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधू शकता

तुम्ही तुमच्या घरातील कामापासून ते बँकेपर्यंतची सर्व कामे आधारद्वारे करता, त्यामुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला आधारशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही टोल फ्री क्रमांक १९४७ वर देखील संपर्क साधू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now free ration can be availed through aadhaar card as well pdb