आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. बँकिंग व्यवहारांशी संबंधित कामासाठी लोक त्याचा वापर करतात. आयकर व्यवहारातही पॅन कार्ड खूप उपयुक्त आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक असल्याने कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला ते आवश्यक आहे. ज्या लोकांचे पॅनकार्ड २०१८ नंतर बनले आहे, ते त्यांचे पॅन कार्ड खरे आहे की बनावट आहे हे आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरुनही ओळखू शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरील प्ले स्टोअरवर आयकर विभागाने तयार केलेला ‘पॅन क्यूआर कोड रीडर’ अॅप डाउनलोड करावे लागेल. जाणून घेऊया या अॅपवरुन बनावट पॅन कार्ड ओळखण्याची सोपी पद्धत…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
‘या’ पद्धतीने तपासा बनावट पॅन कार्ड
- स्कॅन करण्यासाठी तुम्ही Google Playstore वरून तुमच्या फोनवर ‘PAN QR Code Reader’ अॅप तुमच्या फोनवर डाउनलोड करा.
- मोबाईलमध्ये हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला अॅपमधील कॅमेरा व्ह्यूफाइंडर पाहावा लागेल, ज्यामध्ये प्रत्येक रंगाचा प्लस दर्शविला जाईल.
- तुम्हाला तो सापडला तर पॅन कार्डवर दिलेला QR कोड या व्ह्यूफाइंडरमधून घ्यावा लागेल. ते कॅप्चर केल्यावर तुम्हाला बीप आवाज ऐकू येईल.
- यानंतर स्कॅन होताच तुमच्या पॅनकार्डची सर्व माहिती तुमच्यासमोर येईल. ते तपासून तुम्ही तुमचा पॅनकार्ड बनावट आहे की नाही हे ओळखू शकता.
First published on: 16-10-2022 at 12:10 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now identify fake pan card from smartphone pdb