व्हॉट्सअॅपचा वापर आजच्या काळात प्रत्येक स्मार्टफोन यूजर करत आहे. यामुळे मेसेजिंग अॅप आपल्या ग्राहकांना अधिक सुरक्षित करण्यासाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. युजर्सचा वैयक्तिक डेटा सुरक्षित करण्यासाठी 2 स्‍टेप व्हेरिफिकेशन मेसेज, डिसएपीयर फीचर्स आणि बरंच काही ऑफर करतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याशिवाय व्हॉट्सअॅपने लॉक फीचरही दिले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप लॉक करू शकता. जे तुमच्या परवानगीनंतर पुन्हा उघडता येणार नाही. दुसरीकडे, जर कोणी फेस ऑथेंटीकेशन आणि फिंगरप्रिंट स्कॅनरशिवाय उघडण्याचा प्रयत्न केला तर हे फिचर त्या व्यक्तीचे नाव देखील सुचवते.

इनेबल करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत
हे फिचर स्मार्टफोन युजर आणि आयफोन युजर्ससाठी उपलब्ध आहे. ते इनेबल करण्यासाठी फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉकिंग आवश्यक आहे. फोन लॉक केल्यानंतर, तुम्ही व्हॉट्सअॅप कॉल्स प्राप्त करू शकणार नाही. आपल्या स्मार्टफोन आणि आयफोनवर WhatsApp कसे लॉक करायचे ते जाणून घेऊया.

आणखी वाचा : Vivo Y21G स्मार्टफोन लॉन्च, तासनतास वापरल्यानंतरही गरम होणार नाही, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

आयफोन युजर्ससाठी

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या Apple iPhone वर WhatsApp उघडावे लागेल.
  • त्यानंतर वरच्या बाजूला दिलेल्या सेटिंग्ज बटणावर टॅब करा.
  • आता तुमच्या खात्यावर जा.
  • त्यानंतर Privacy या पर्यायावर क्लिक करा.
  • खाली स्क्रोल करा आणि स्क्रीन लॉक पर्याय निवडा.
  • आता टूगल ऑन करा, एकदा लॉक फिचर इनेबल झाल्यावर, तुम्ही फेस आयडी आणि पिन वापरून WhatsApp अनलॉक करून वापरू शकता.

Android मध्ये लॉक कसे करावे :

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp ओपन करा.
  • नंतर वरच्या बाजुला असलेल्या तीन बिंदूंवर टॅब करा.
  • आता मेनूमधील सेटिंग्जवर जा.
  • त्यानंतर सेटिंगमध्ये अकाउंट ऑप्शनवर जा आणि प्रायव्हसी ऑप्शन निवडा.
  • त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करा आणि फिंगरप्रिंट लॉक करा.
  • एकदा हे फिचर इनेबल झाल्यानंतर, तुम्ही फिंगरप्रिंट वापरून ते अनलॉक करू शकता.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now no one will be able to read personal messages lock your whatsapp in smartphone and iphone like this prp
Show comments