आता तुम्ही स्विगी (Swiggy) किंवा झोमॅटोवरून (Zomato) जेवण मागवले असेल आणि काही वेळाने तुम्हाला तुमच्या खिडकीच्या बाहेर ड्रोन दिसल्यास आश्चर्यचकित होऊ नका. लवकरच ही गोष्ट सत्यात उतरणार आहे. इतकाच नाही तर कोणत्याही डिपार्टमेंटल स्टोरमधून तुम्ही सामान मागवले असेल तर ते सामान तुमच्या घरी पोहचवण्यासाठी ड्रोन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्रोन डिलिव्हरीसाठी अनेक कंपन्या तयारी पूर्ण करत आहेत.

लास्ट माईल डिलिव्हरी कंपनी झेप इलेक्ट्रिक (Zypp Electric)ने मागच्याच आठवड्यात सांगितलं की ते ड्रोन लॉजिस्टिक सेक्टरमध्ये उतरण्यास पूर्णपणे तयार आहेत. आतापर्यंत, इलेक्ट्रिक वाहनाद्वारे वितरण करणार्‍या कंपनीने ड्रोनद्वारे वस्तू वितरीत करण्यासाठी टीएसएडब्ल्यू (TSAW) ड्रोनशी हातमिळवणी केली आहे. पहिल्या टप्प्यात ही कंपनी आपले २०० ड्रोन बाजारात उतरवणार आहे. सध्या दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि पुण्यात हे ड्रोन डिलिव्हरी करतील.

Rumors bomb plane, Airline, Rumors bomb,
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
loksatta editorial on india china relations
अग्रलेख : मुहूर्ताची मँडरिन मिठाई!
tejas mk1a
विश्लेषण: हवाई दलाची चिंता का वाढतेय?
Diwali bonus of six thousand rupees to Asha worker from Thane Municipal corporation
ठाणे पालिकेकडून आशा सेविकांना सहा हजार रुपयांची दिवाळी भेट; सानुग्रह अनुदानसह ऑक्टोबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांचे बॅंक खात्यात जमा
pune police return lost mobile sets to citizens on diwali occasion
दिवाळीत पोलिसांची अनोखी भेट; गहाळ झालेले मोबाइल संच नागरिकांना परत

डिलिव्हरीसाठी होणार ‘या’ ड्रोन्सचा वापर

टीएसएडब्ल्यू (TSAW) ड्रोन्स ही कंपनी डिलिव्हरी करणारे ड्रोन तयार करते. खास करून डिलिव्हरीसाठी वापरले जाणारे अनेक ड्रोन या कंपनीने आधीच तयार केलेले आहेत. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर डिलिव्हरी ड्रोनच्या दोन मॉडेल्सची माहिती देण्यात आली आहे. पहिला मॉडेल ‘मारुती २.०’ (Maruthi 2.0) आहे जो कमी अंतराच्या (४० किलोमीटर) डिलिव्हरीसाठी वापरण्यात येईल. तर दुसरा ड्रोन ‘अदारणा’ची (Adarna) डिलिव्हरी रेंज ११० किलोमीटर इतकी आहे. हे दोन्ही मॉडेल ५ किलोपर्यंतचा भार उचलू शकतात.

डिलिव्हरी ड्रोनमध्ये असेल स्मार्ट लॉकर

आता जितके द्रोण डिलिव्हरीसाठी उतरवण्यात येतील त्या सर्वांमध्ये स्मार्ट लोकर असेल असे झेप इलेक्ट्रिकने (Zypp Electric) सांगितले आहे. ज्या ग्राहकांना डिलिव्हरी दिली जाणार असेल त्यांना एक ओटीपी देण्यात येईल. या ओटीपीचा वापर करून हा लॉकर उघडण्यात येईल. यामुळे डिलिव्हरी करण्यात येणाऱ्या सामानाची सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल. ड्रोनने डिलिव्हरी करण्यास सुरुवात झाल्यानंतर लोकांचा वेळही वाचण्यास मदत होईल.

गल्लोगल्ली डिलिव्हरी अद्याप शक्य नाही

हे ड्रोन फक्त शहरातील अपार्टमेंटमध्येच नाही तर रिमोट लोकेशनला पण डिलिव्हरी करतील. स्वतःहून लोकेशन ट्रॅक करण्याची टेक्नॉलॉजी या ड्रोनमध्ये असेल. याव्यतिरिक्त या डिलिव्हरी ड्रोनमध्ये रिमोट-आयडी (रिमोट-आयडी) आणि डिटेक्ट अँड अव्हॉइड (DAA) सारख्या नवीन टेक्नॉलॉजीचा देखील वापर करण्यात आला आहे. ही टेक्नॉलॉजी ड्रोनला हवेत उडणारी वस्तू आणि बिल्डिंगपासून वाचण्यास मदत करेल. सध्या ही सुविधा बहुमजली इमारतींमध्ये सुरु करण्यात येईल. अरुंद गल्ल्यांमध्ये ड्रोन पोहोचवण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे रस्त्यावरील तारांचे जाळे. त्यामुळे अशा परिसरांमध्ये ड्रोन चालवण्यात अडचणी येऊ शकतात.