Wi Fi Service in Flight: आजकाल कुठेही गेलात की तुम्हाला Data किंवा Wifi ची नितांत आवश्यकता असते, जेणेकरून तुम्ही काही मनोरंजन करु शकता. पण विमानात बसल्यावर मात्र, या सर्व गोष्टींना मुकावं लागतं. आजही विमानामध्ये बसल्यावर तुमच्याजवळ असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तुम्हाला एकतर बंद करावे लागतात किंवा Airplane Mode वर सेट करावे लागतात. त्यामुळे Data काय किंवा Wifi काय कशाचाच वापर करता येत नाही. परंतु आता विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हालाही आकाशात उडताना वाय-फायच्या माध्यमातून हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या तुमच्या आवडीचे चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

Air Asia आणि  Sugarbox ने सुरू केली Airflix ची नवीन सेवा

एअर एशिया आणि शुगरबॉक्स अंतर्गत प्रवाशांना आता विमानात मोफत ओटीटी कंटेंट पाहण्याची संधी मिळणार आहे. एअर एशिया आणि शुगरबॉक्स यांनी संयुक्तपणे एअरफ्लिक्स सेवा सुरू केली आहे. एअरफ्लिक्स सेवेअंतर्गत प्रवासांना ६००० तासांपेक्षा जास्त एचडी कंटेंट, १ हजारांहून अधिक हॉलिवूड- बॉलिवूड चित्रपट, वेबसिरीज पाहण्याची संधी मिळणार आहे. एअरफ्लिक्स सेवेसह युजर्सना इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी शिवाय म्हणजेच इंटरनेटशिवाय कंटेंटचा अनुभव घेता येईल.

एअर एशिया आणि शुगरबॉक्सची ही सेवा पेटंट क्लाउडक्षमतेवर आधारित आहे. विशेष बाब म्हणजे, युजर्सना कंटेंट पाहताना फ्लाइटमध्ये बफरिंग सारखी कोणतीही समस्या येणार नाही. युजर्सना 1Gbps पर्यंत स्पीड आणि 8TB स्टोरेज मिळेल. युजर्स फ्लाइटमध्येच बातम्या वाचण्यासोबत गेमिंगचा अनुभव घेऊ शकतील. तसेच, युजर्स ऑनलाइन शॉपिंग देखील आनंद घेऊ शकणार आहेत.

(आणखी वाचा : वनप्लस स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी: लवकरच मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला येतोय ‘OnePlus Ace 2’ स्मार्टफोन; फीचर्स लीक )

आतापर्यंत ओटीटी कंटेट पाहण्याची सुविधा फक्त एअर विस्तारामध्ये उपलब्ध होती. पण विस्ताराचे प्रवासी वेबसिरीज पाहणे, खरेदी करणे या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाही. परंतु एअर एशियाने एअरफ्लिक्सच्या माध्यमातून विमान प्रवासाचा प्रवास सुखकर होण्यासाठी ही सुविधा सुरू केली आहे, असे शुगरबॉक्सचे सह-संस्थापक रोहित परांजपे यांनी सांगितले आहे.

विमान प्रवाशांना मिळणार ‘या सुविधा
ओटीटी कंटेट पाहण्याची सुविधा
बातम्या
पॉडकास्ट
इन-फ्लाइट एफ अँड बी ऑर्डरिंग सुविधा

Story img Loader