व्हॉट्सअॅपच्या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे त्यातील सर्व वैशिष्ट्ये आणि त्याची विनामूल्य सेवा. म्हणजेच, लोक पैसे न देता व्हॉट्सअॅप वापरतात. परंतु अलीकडेच मेटाच्या मालकीच्या या कंपनीने व्हॉट्सअॅप प्रीमियम सेवा जाहीर केली आहे. लवकरच हे लॉन्च होणार असून ही सशुल्क सेवा असेल. अशा स्थितीत लोकांच्या मनात याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आज आपण याच्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे जाणून घेणार आहोत.
व्हॉट्सअॅप प्रीमियम ही व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी किंवा विविध कंपन्या आणि संस्थांसाठी सदस्यत्व आधारित सेवा आहे. यामध्ये, युजर्सना त्यांच्या व्यावसायिक खात्यांमध्ये व्हॅनिटी युआरएल, पूर्वीपेक्षा अधिक लिंक केलेले डिव्हाइसेस, यासारखे अतिरिक्त फीचर्स मिळतील. याच्या लॉन्चिंगबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी येत्या २ ते ३ महिन्यांत हे फीचर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्हॉट्सअॅप प्रीमियममध्ये काय खास असेल?
मेटाने अद्याप या सेवेचे अनावरण केलेले नाही आणि त्याशी संबंधित जास्त माहिती देखील शेअर केलेली नाही. इतकं असूनही वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये त्याचे फीचर्स सांगण्यात येत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, यामध्ये यूजर्सना असे अनेक खास फीचर्स मिळतील, ज्याचा त्यांना खूप फायदा होईल. आपण त्याच्या संभाव्य फीचर्सबद्दल जाणून घ्या.
Whatsapp ग्रुप सोडल्यावर फक्त अॅडमिनलाच जाणार नोटीफिकेशन; जाणून घ्या काय आहे नवे फीचर
- दहा डिव्हाइस केले जाऊ शकतात लिंक :
तुम्ही आता व्हॉट्सअॅपची सामान्य व्हर्जन चार डिव्हाइसमध्ये रन करू शकता, परंतु प्रीमियम सेवेत तुम्हाला दहा अतिरिक्त डिव्हाइस जोडण्याचा पर्याय मिळू शकतो. याच्या मदतीने अनेक लोक कंपनीच्या पेजवर नजर ठेवू शकतील.
- व्हॅनिटी युआरएल :
व्हॉट्सअॅप प्रीमियममध्ये, वापरकर्त्यांना व्हॅनिटी युआरएलची सुविधा देखील मिळू शकते. म्हणजेच, त्याच्या वापरकर्त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कस्टम लिंक्स जनरेट करण्याचा पर्याय मिळेल.
- व्हॉट्सअॅप प्रीमियम व्हॅनिटी युआरएल :
तज्ञांच्या मते, जेव्हा युजर व्हॅनिटी युआरएल तयार करतो तेव्हा त्याचा व्यावसायिक फोन नंबर लपविला जात नाही. जेव्हा ग्राहक तुमच्याशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधतील तेव्हा त्यांना फोन नंबर दिसेल. तथापि, व्यवसायाच्या नावासोबत एक लहानसे कस्टम युआरएल बनवणे याला अधिक चांगले बनवते.