Book Uber Ride with Whatsapp: लोकप्रिय अॅप व्हॉट्सअॅपवर युझर्सना नवनवीन सुविधा मिळत असतात. मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर पैसे पाठवण्याचे फीचर्स आले होते. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपवर युझर्सना कॅब बुक करता येणार आहे. त्यामुळे प्रवासासाठी नेहमी खाजगी वाहनांवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रथमच Uber आणि WhatsApp ने त्यांच्या भागीदारीची घोषणा केली असून याचा थेट फायदा युजर्सना होणार आहे. युजर्स आता व्हॉट्सअॅपवरून उबर कॅब बुक करू शकतील. जाणून घेऊयात व्हॉट्सअॅपवर कशाप्रकारे सोप्प्या पद्धतीत कॅब बुक करता येणार.
(हे ही वाचा : WhatsApp New Feature: अँड्रॉइडवर शेअर करता येणार डेटा; काय आहे नवे फीचर जाणून घ्या )
हे व्हॉट्सअॅपच्या बिझनेस प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले असून सध्या हे प्रथम पायलट प्रोजेक्ट दिल्ली-एनसीआर आणि लखनऊमध्ये सुरू करण्यात आली आहे. लवकरच ते भारतातील इतर शहरांमध्ये देखील लाँच केले जाईल. उबर कार, उबेर मोटो (मोटारसायकल) आणि ऑटो या फीचरद्वारे बुक करता येतात. जे वापरकर्ते व्हॉट्सअॅपद्वारे कॅब बुक करतात त्यांना थेट उबर अॅपवर राइड बुक करण्याइतकीच सुरक्षा प्रदान केली जाईल. व्हॉट्सअॅपद्वारे कॅब बुक केल्यानंतरही, स्वत:चे नाव किंवा कॅब ड्रायव्हरचे नाव आणि लायसन्स प्लेट अशी माहिती वापरकर्त्यांना पाठवली जाईल.
(हे ही वाचा : Amazon Sale मध्ये बंपर डिस्काउंट! Samsung सह ‘हा’ तगडा स्मार्टफोन मिळताेय ‘इतक्या’ स्वस्तात )
व्हॉट्सअॅपद्वारे ‘अशी’ बुक करा कॅब
तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅपवर +९१ ७२९२०००००२ या नंबरवर ‘हाय’ लिहून मेसेज करावा लागेल.
मेसेज केल्यानंतर, तुम्हाला चॅटबॉक्समध्ये पिकअप आणि ड्रॉप लोकेशन विचारले जाईल.
ठिकाण सांगितल्यानंतर तुम्हाला राइडची माहिती दिली जाईल, त्यानंतर भाडे आणि ड्रायव्हरची वेळ तुम्हाला सांगितली जाईल.
तुम्ही ओके केल्यानंतर, तुम्हाला ड्रायव्हरची माहिती आणि OTP पाठवला जाईल.
यानंतर तुम्ही OTP टाकून राइड सुरू करू शकाल.
पिकअपसाठी तुम्ही लाइव्ह लोकेशन देखील शेअर करू शकता.