अनिवासी भारतीयांना (एनआरआय व्यक्ती) भारतात आल्यानंतर युपीआयचा वापर करता येणार आहे. काही निवडक देशांच्या व्यक्तींनाच ही सेवा उपलब्ध होणार आहे. एनआरइ/एनआरओ या अकाउंट्सचा वापर करुन इंटरनॅशनल नंबरवरुन युपीआय पेमेंट करता येणार आहे.
‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडुन जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार इंटरनॅशनल नंबर्ससाठीही युपीआय सुविधा उपलब्ध करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही सुविधा १० देशांना काही अटींसह उपलब्ध होईल.सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, यूएसए, सौदी अरेबिया, युनायटेड किंगडम यांसह आणखी काही देशांतील एनआरआय व्यक्तींसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
या युपीआय पेमेंट साठी काही अटी बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट’च्या नियमात बसणाऱ्या एनआरइ/एनआरओ अकाउंट्सचाच वापर करता येईल. तसेच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्व/सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.