आजकाल अनेक जण ओलाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. गूगल मॅपवरून तुमचे लोकेशन ओळखून ओला चालक तुमच्या दारापर्यंत यायचा आणि तुम्हाला जेथे जायचे आहे, त्या अचूक पत्त्यावर पोहोचवायचा. पण, ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आता कंपनी गूगल मॅप्सला वगळून स्वतःचे इन-हाउस ओला मॅप्स (Ola Maps) वापरणार आहे. नेमके यामागील कारण काय? आपण ओला मॅप्सबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओला कंपनी गूगल मॅप्सआणि मायक्रोसॉफ्ट ‘ॲझ्युअर’मधून पूर्णपणे बाहेर पडली आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर)वर याबाबतची पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी, “आम्ही आता गूगल मॅप्समधून पूर्णपणे बाहेर पडलो आहोत. आम्ही Google Maps वर दरवर्षी १०० कोटी रुपये खर्च करायचो. पण आम्ही आमच्या इन-हाऊस ओला (Ola) मॅप्सवर पूर्णपणे शिफ्ट होऊन, या महिन्यात तो खर्च शून्यापर्यंत कमी केला आहे. तुमचे ओला ॲप तपासा आणि आवश्यक असल्यास अपडेट करा. तसेच, ओला मॅप्स API हे Krutrim क्लाउडवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर स्ट्रीट ह्युव, एनईआरएफ (NERF), घरातील फोटो, थ्रीडी नकाशे, ड्रोन नकाशे इत्यादीसारखी आणखी बरीच फीचर्स लवकरच येत आहेत”, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा…गूगल मॅपसह प्लॅन करा तुमची पिकनिक; कुठे भेटायचं, किती वेळात पोहचायचं ? ‘हे’ आता तुम्हाला नवीन फीचर सांगणार

पोस्ट नक्की बघा…

तसेच कंपनीने ओला मॅप्स (Ola Maps) कसे तयार केले याबद्दल उत्सुक असलेल्यांच्या माहितीसाठी या आठवड्याच्या शेवटी एक ब्लॉग पोस्ट प्रकाशित करण्यात येणार आहे. हा ब्लॉग स्पष्ट करेल की, ओला मॅप्सचे कोणते भाग इन-हाउस बनविले गेले आणि कोणते भाग ओपन-सोर्स संसाधनांमधून आले आहेत. ओला मॅप्सच्या मागे असलेल्या तंत्रज्ञानाबद्दल अधिक जाणून घेण्याची ही तंत्रज्ञानप्रेमींसाठी एक संधी आहे.

Ola चे Google Maps आणि Azure वरून त्यांच्या स्वतःच्या Ola Maps वर स्विच करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून, ओला केवळ मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत करत नाही, तर आपली ताकद दाखवत आहे. भाविश अग्रवाल यांनी १५ डिसेंबर रोजी भारतातील पहिले आर्टिफिशयल इंटेलिजन्स (AI) मॉडेल ‘क्रिस्टीम’ लाँच केले. कृत्रिम AI लाँच करण्याच्या निमित्ताने, कंपनीने क्लाउड सेवा आणि मॅपिंग सोल्युशन्ससाठी आपल्या योजनादेखील सादर केल्या आहेत. हे करतानाच आज कंपनीने गूगल मॅप्सला गुड बाय म्हणत ओला मॅप्सवर स्विच केले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ola dropping google maps opting for their own ola maps to save costs and enhance services ceo bhavish aggarwal announced on twitter asp
Show comments