इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन बनवणारी कंपनी एलजी (LG) इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मोबाइल, वॉशिंग मशीन, फ्रिज आदी वेगवेगळी उत्पादने ग्राहकांसाठी लाँच करीत असते. आता कंपनीने सगळ्यात मोठ्या टेक शोमध्ये म्हणजेच कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो २०२४ मध्ये (Consumer Electronic Show 2024) जगातील पहिल्या पारदर्शक ओएलईडी (OLED – Organic Light-Emitting Diode ) टीव्हीचे अनावरण केले आहे.
जगातील सर्वांत मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान कार्यक्रम सीईएस-२०२४ हा शो १२ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या शोमध्ये १५० हून अधिक देशांतील ४०० कंपन्या त्यांची नवोत्पादने सादर करणार आहेत. तर एलजीने सीईएस २०२४ मध्ये (CES 2024) कंपनीने ओएलईडी (OLED) इनोव्हेशन्ससह एलजी (LG) जगातील पहिल्या वायरलेस पारदर्शक टीव्हीचे अनावरण केले आहे. एलजी कंपनीच्या ओएलईडी टी (OLED T) नावाच्या या टीव्हीमध्ये डिस्प्लेवर एक ग्लास आहे; जो टीव्ही बंद करताच तुम्हाला दिसणार नाही.
कंपनीने सांगितले की, टीव्ही पारदर्शक आणि वायरलेस एव्ही ट्रान्स्मिशन तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. टीव्हीमध्ये सेल्फ-लिट पिक्सेल तंत्रज्ञान आहे; जे टीव्हीवर दिसणाऱ्या चित्रांची गुणवत्ता आणि त्याचे 4k रिझोल्युशन सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. तसेच एलजी मॉडेल ओएलईडी टी (OLED T) मध्ये काळा आणि पारदर्शक दोन स्क्रीन मोड असणार आहेत. पारदर्शक मोडमध्ये टीव्हीच्या मागे असणाऱ्या वस्तूंवर टीव्हीतील दृश्य पाहण्याचा अनोखा अनुभव मिळेल. तसेच जर तुम्हाला ट्रॅडिशनल स्टाईलमध्ये टीव्ही पाहायचा असेल, तर तुम्ही रिमोट कंट्रोलवर क्लिक करून स्क्रीन काळ्या रंगातसुद्धा बदलू शकणार आहेत.
हेही वाचा…मोटोरोलाने भारतात लाँच केला हा ५ जी स्मार्टफोन! फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळणार… किंमत फक्त
फीचर्स :
एलजी सिग्नेचर ओएलईडी टी OLED T हा Ai प्रोसेसर, द अल्फा ११ (The Alpha 11) ने परिपूर्ण आहे. तसेच एलजी इलेक्ट्रिनिक्स चालवणारा WebOS स्मार्ट टीव्ही ७०% ग्राफिक्स आणि ३०% वेगवान प्रोसेसिंग गतीने चारपट परफॉर्मन्स ऑफर करतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार Appha 11 प्रोसेसर टीव्हीवर चित्राची गुणवत्ता वाढवतो. तसेच हा टीव्ही सोईनुसार आणि स्थानिक आवाजाशी जुळवून रंगसुद्धा सुधारून देतो. त्याशिवाय OLED T मध्ये डाऊन-फायरिंग स्पीकरसुद्धा आहेत. तसेच खास गोष्ट अशी की, या सगळ्यात एलजी कंपनीचा टीव्ही झिरो कनेक्ट बॉक्ससह येतो (zero connect box); जो टीव्ही वायरलेस ऑडिओ आणि व्हिडीओ प्रदान करतो. तसेच हा झिरो कनेक्ट बॉक्स स्ट्रीमिंग डिव्हाइस आणि गेम कन्सोल कनेक्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो.
कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो २०२३ मध्ये डेल (Dell) कंपनीने अधिकृतरीत्या 13th जनरेशन इंटेल सीपीयूएस (Intel CPUs) आणि नेक्स्ट जनरेशन NVIDIA GPU सह नवीन गेमिंग लॅपटॉप्स लाँच केले होते. तर या वर्षी या कंपनीने एलजीचा ओएलईडी टी (OLED T) हा वायरलेस आणि पारदर्शक टीव्ही लाँच केला आहे.