सध्या व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात महत्वाचे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म झाले आहे. करोडो लोक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले असून वैयक्तिक ते व्यावसायिक काम व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून केले जात आहे. पण आता मात्र, दिवाळीत व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांना धक्का बसणार आहे. दिवाळीत व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या फोनमध्ये चालणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. तुमचा स्मार्टफोन या यादीत तर नाही तपासा.

जुन्या आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही

व्हॉट्सअ‍ॅप वेळोवेळी नवं अपडेट आणत असतं. आता पुन्हा एकदा जुन्या उपकरणांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट बंद करण्यात आला आहे. म्हणजेच जुन्या उपकरणांवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. अनेक जुन्या आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही. हे दिवाळीत म्हणजेच २४ ऑक्टोबर २०२२ पासून iOS 10 आणि iOS 11 आवृत्त्यांवर काम करणाऱ्या आयफोनवर काम करणार नाही. म्हणजेच iOS 12 किंवा त्यावरील आवृत्तीला सपोर्ट न करणाऱ्या आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही. म्हणजेच यूजर्स त्यांच्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकणार नाहीत.

आणखी वाचा : अर्रर… OnePlus 11 5G बाजारपेठेत लाँच होण्यापूर्वीच फीचर्स लीक; ५०००mAh बॅटरीसह मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

व्हॉट्सअ‍ॅप काही जुन्या आयफोनसाठी बंद होत आहे. अशा परिस्थितीत, जर तुमचा आयफोन जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असेल तर तुम्हाला तो लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमवर अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन जनरल या पर्यायावर जावे लागेल. यानंतर, तुम्ही सॉफ्टवेअर अपडेटवर क्लिक करून नवीनतम iOS आवृत्ती स्थापित करू शकता. याचा अर्थ तुम्ही अजूनही iPhone 5S, iPhone 6 आणि iPhone 6S सारख्या जुन्या आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या फोनचे iOS वजन अपडेट करावे लागेल, तुम्ही सेटिंग्ज जनरल सेटिंगमध्ये जाऊन अपडेट तपासू शकता.

आयफोन ५ वापरकर्त्यांनाही व्हॉट्सअॅप बंद करण्याची सूचना दिली जात आहे. अशा परिस्थितीत तुम्ही हे फोन वापरत असाल तर दिवाळीत ते बदलण्याची वेळ आली आहे.

Story img Loader