ओप्पो ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत असते. तर आता कंपनीने ग्राहकांसाठी एक खास योजना सादर केली आहे. ओप्पोने बुधवारी घोषणा केली की, ग्राहकांना सर्व्हिस सेंटरला भेट न देता स्मार्टफोन समस्या स्वतःहून सोडवता याव्यात, या उद्देशाने कंपनीचा स्वतःचा ‘सेल्फ-हेल्प असिस्टंट डिजिटल’ सेवा सुरू करत आहे. शुक्रवारी जागतिक ग्राहक हक्क दिनापूर्वी या खास गोष्टीची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय ग्राहक तंत्रज्ञान जाणणारे आहेत. तसेच हे पोर्टल वापरकर्त्यांना सर्व्हिस सेंटरला न जाता त्यांच्या ओप्पो स्मार्टफोनच्या बाबतीत समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्व माहिती पुरवणार आहे. सेल्फ-हेल्प असिस्टंटसह ओप्पो ग्राहकांसाठी गोष्टी सोप्या करणार आहे. हा उपक्रम ग्राहकांच्या सोयीसाठी आणि ओप्पो डिव्हाइसच्या मालकीचा अनुभव वाढवण्यासाठी करण्यात आला आहे; असे ओप्पो इंडियाचे उत्पादन कम्युनिकेशन संचालक सॅवियो डिसोझा यांनी एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा…Airtel चा करोडो ग्राहकांना दणका! गुपचूप महाग केले ‘हे’ दोन रिचार्ज प्लॅन, पाहा नवीन दर
ग्राहक कसा घेऊ शकणार लाभ?
सेल्फ-हेल्प असिस्टंट सेवा कंपनीच्या वेबसाइटवर किंवा त्याच्या ॲपवर सपोर्ट टॅबवर नेव्हिगेट करून ॲक्सेस केली जाऊ शकते. Assistant (सहाय्य्क) हा पर्याय उघडल्यानंतर वापरकर्त्यांना त्यांचे डिव्हाइस इंटरफेसमधून निवडायचे आहे. त्यानंतर ते डाव्या बाजूला प्रदर्शित होणारे सिम्युलेशन आणि समस्यानिवारण पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात. तसेच वापरकर्ते वरच्या उजव्या बाजूला असलेल्या बटणासह त्यांच्या डिव्हाइसची संपूर्ण वैशिष्ट्येदेखील तपासू शकतात. सिम्युलेशन विभाग वापरकर्त्यांना त्यांच्या फोनची वैशिष्ट्ये डिजिटल स्टेप बाय स्टेप मार्गदर्शकांसह एक्सप्लोर करण्यात आणि समजून घेण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे. तुम्ही फक्त शोध बॉक्समध्ये तुमची समस्या (queries) टाइप करू शकता.
ओप्पोचा हा उपक्रम युजर्सच्या डेटा, नेटवर्किंग आदी अनेक मोबाइल उपकरणाच्या एखाद्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करणे आहे. कंपनी वापरकर्त्याच्या समस्येचे निराकरण झाले की नाही यावर थंब्स-अप (लाइक) किंवा थंब्स-डाउन (डीसलाइक) स्वरूपात फीडबॅक घेतो. जर ग्राहकांच्या समस्येचे निराकरण झाले नाही, तर ते त्यांची संपर्क माहिती कंपनीकडे समाविष्ट करू शकतात आणि त्यावेळी ओप्पो ग्राहक प्रतिनिधी युजर्सशी संबंध साधेल