भारतीय खाद्यपदार्थ हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. संपूर्ण जग हे भारतीय खाद्यपदार्थांचे कौतुक करते. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. ज्यामध्ये ठराविक अंतरावर वेशभूषा , भाषा बदलत असते. तसेच खाद्यपदार्थांचे देखील आहे. तसेच देशातील लोकांना वेगवेगळे खाद्यपदार्थ टेस्ट करण्यास आवडते. भारतामध्ये फूड डिलिव्हरी सिस्टिमसुद्धा चांगली आहे. अनेक कंपन्या लोकांना घरी बसून जेवण ऑर्डर करण्याची सुविधा देतात. एखाद्या दिवशी तुम्हाला स्वयंपाक करण्याचे मन नसेल तर तुम्ही जवळील हॉटेल, कॅफे किंवा अन्य खाद्यपदार्थ मिळण्याच्या ठिकाणांवरून काही मिनिटांमध्ये झोमॅटो किंवा स्विगीच्या माध्यमातून ऑर्डर करू शकता.
मात्र आता Zoamto आणि Swiggy शी स्पर्धा करण्यासाठी ONDC हा एक प्लॅटफॉर्म आला आहे. ओएनडीसी म्हणजे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. हा असा प्लॅटफॉर्म आहे की जे रेस्टॉरंट मालकांना कस्टमरला अन्न विकण्याची सुविधा देते आणि यामध्ये थर्ड पार्टी जसे की zomato आणि swiggy ची गरज लागत नाही. थर्ड पार्टी यात नसल्यामुळे यामध्ये खाद्यपदार्थ अत्यंत स्वस्तामध्ये मिळतात.
ONDC ची सुरुवात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून झाली होती. हळूहळू हे लोकप्रिय होत आहे. आता ONDC द्वारे दररोज १०,००० हून अधिक ऑर्डर वितरित केल्या जात आहेत. मागील काही दिवसांमध्ये काही लोकांनी सोशल मीडियावर Swiggy, Zomato आणि ONDC शी संबंधित स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते एकमेकांच्या किंमतींची तुलना करत आहेत व लोकांना सांगत आहेत की ONDC कडून स्वस्त अन्नपदार्थ मिळत आहे.
ONDC App वापरण्यासाठी तुम्हाला Paytm app वर जावे लागेल. पेटीअममध्ये गेल्यावर सर्चमध्ये ONDC टाईप करा. आता येथे तुम्हाला किराणा मालापासून ते खाद्यपदार्थांपर्यंत असे विविध पर्याय दिसतील. तिथून तुम्हाला जे हवे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. मात्र हे प्लॅटफॉर्म अद्याप नवीन आहे. यामुळे त्याच्यावर जास्त रेस्टॉरंट्स उपलब्ध नाहीत. परंतु तुम्हाला मुख्य किंवा मोठी रेस्टॉरंट्स ONDC वर आढळतील.