One Community Sale : वनप्लसच्या (OnePlus) स्मार्टफोनची मार्केटमध्ये क्रेज आहे. दमदार स्पेसिफिकेशन्ससह हे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे वनप्लस कंपनीच्या नवीन सीरिजबाबत मोबाइलप्रेमींमध्ये कायमच उत्सुकता असते. पण, जर हे स्मार्टफोन तुम्हाला कमी किमतीत मिळाले किंवा या स्मार्टफोनवर तुम्हाला आकर्षक बक्षिसे मिळाली तर तुम्ही खरेदी कराल का? हो… तर स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस ग्राहकांसाठी काहीतरी खास घेऊन आली आहे. वनप्लस कंपनीने ‘वन कम्युनिटी सेल’ची घोषणा केली आहे. फोल्डेबल स्मार्टफोनच्या विक्रीत सुधारणा करण्यासाठी टेक कंपनीने हे पाऊल उचललं आहे. या सेलमध्ये तुम्हाला कोणत्या स्मार्टफोनवर ऑफर मिळणार आहे चला पाहू.

कंपनी तिच्या फ्लॅगशिप मॉडेल्सवर विविध सवलती आणि बोनस ऑफर करते आहे. वनप्लसचा कम्युनिटी सेल ११ जूनपर्यंत असणार आहे. यात कंपनीच्या ऑनलाइन स्टोर, ई-कॉमर्स साइट Amazon आणि ऑफलाइन स्टोर्सवर कमी किमतीत स्मार्टफोन्स खरेदी करता येतील. तसेच ग्राहकांना बँक डिस्काउंटचादेखील फायदा मिळू शकतो, त्यामुळे वनप्लसचे प्रोडक्ट्स या सेलमध्ये कमी किमतीत विकत घेता येतील.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल

हेही वाचा…Apple Day Sale : कमी पैशात Apple च्या वस्तू खरेदी करण्याची संधी; आयफोनसह ‘या’ चार प्रोडक्टवर मिळणार जबरदस्त ऑफर

वनप्लस ओपन (OnePlus Open) या स्मार्टफोनच्या खरेदीदारांना सर्व विक्री चॅनेलवर मोफत वनप्लस वॉच २( OnePlus Watch 2) स्मार्टवॉच मिळेल. वनप्लस ओपनची भारतात किंमत १,३९,००० रुपये आहे आणि सर्व खरेदीदारांना यावर २४,९९९ रुपये वनप्लस वॉच २ मोफत मिळणार आहे. मोफत स्मार्टवॉच व्यतिरिक्त खरेदीदारांना आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, वनकार्ड, बीओबीसीएआरडी आणि आयडीएफसी फर्स्ट बँक कार्ड्ससह स्मार्टफोन खरेदी करताना पाच हजार रुपयांची झटपट बँक सवलतदेखील दिली जाईल. तसेच युजर्स Amazon, वनप्लस स्टोअर्स आणि रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स आणि बजाज इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या इतर रिटेल स्टोअरद्वारे १२ महिन्याच्या विना-किंमत EMI चा लाभही घेऊ शकतात.

वनप्लस ओपन फीचर्स –

वनप्लस ओपन २४४० x २२६८ पिक्सेलच्या स्क्रीन रिझोल्यूशनसह ७.८२ इंच ProXDR डिस्प्लेसह येतो. याचा स्क्रीन रिफ्रेश दर १२० एचझेडपर्यंत आहे. स्मार्टफोनमध्ये २,८०० nits ची ब्राइटनेस आणि १४४० एचझेड PMW फ्रिक्वेन्सी डायमिंग (frequency dimming) , क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ५ एसओसी, १६ जीबी LPDDR5X रॅम आणि ५१२ जीबी UFS 4.0 स्टोरेजसह सुसज्ज आहे. फोल्डेबल स्मार्टफोन अँड्रॉइड १३ आधारित ऑक्सिजन ओएसवर (13-based Oxygen OS) चालतो. यात फ्लेक्सिअन बिजागर डिझाइनदेखील आहे, जे स्क्रीनच्या दोन भागांना दुमडण्यास मदत करते.