वनप्लस कंपनीने अखेर आपला ‘वनप्लस ओपन’ हा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. काल मुंबई येथे संध्याकाळी झालेल्या इव्हेंटमध्ये कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बाजारात वनप्लसने एक विश्वसनीय ब्रॅण्ड म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. कंपनीने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केल्यामुळे वनप्लसच्या ग्राहकांना देखील आनंद झाला आहे. या फोनचे स्पेशल फीचर्स , स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबद्दल जाणून घेण्यासही सर्वच जण उत्सुक आहेत. या फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

OnePlus Open : फीचर्स

वनप्लस ओपनच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये कॉम्पॅक्ट डिझाइन देण्यात आले आहे. फोनची उंची १५३.४ मिमी इतकी आहे. तर फोनचे वजन हे जवळपास २३९ ग्रॅम इतके आहे. तसेच एमराल्ड डस्कचे वजन जवळपास २४५ ग्रॅम इतके आहे. वनप्लस ओपननमध्ये वापरकर्त्यांना ७.८२ इंचाचा फ्लॅक्सि फ्लयुड AMOLED प्रायमरी डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा ब्राइटनेस २८०० नीट्स इतका आहे. याशिवाय डिस्प्लेचे रिझोल्युशन २४४० x २२६८ पिक्सेल इतके आहे. तसेच फोनचा बाहेरील डिस्प्ले हा ६.३१ इंचाचा डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्युशन २ के इतके आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच हा फोन नवीन OxygenOS १३.२ वर आधारित अँड्रॉइड १३ वर चालतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक

हेही वाचा : iPhone 15 Pro फक्त ९३ हजारांमध्ये खरेदी करण्याची संधी, ‘या’ ठिकाणी मिळतोय आकर्षक डिस्काउंट

OnePlus Open : कॅमेरा

वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यामध्ये सोनीचा LYT-T808 ‘पिक्सेल स्टॅक्ड’ (Pixel Stacked) CMOS सेन्सर OIS सह येतो. तसेच यामध्ये ६४ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा जोडण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वापरकर्त्यांना ६० FPS सह ४ के क्वालिटीमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करता येणार आहेत. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओसाठी २० मेगापिक्सलचा प्राथमिक व ३२ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा मिळणार आहे. फेस अनलॉक, नाइटस्केप सेल्फी, सेल्फी एचडीआर, टाइम लॅप्स, ड्युअल व्ह्यू व्हिडीओ आणि अन्य काही फीचर्स देण्यात आले आहेत.

वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ४,८०५ mAh क्षमतेची बॅटरी देण्यात अली आहे. तसेच याला ६७ W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनची बॅटरी ४२ मिनिटांमध्ये १ ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते असे कंपनीचे म्हणणे आहे. एकदा चार्ज केल्यास एका दिवसापेक्षा अधिक काळ वापरता येऊ शकतो. रिटेल बॉक्समध्ये ग्राहकांना एक चार्जर देखील मिळणार आहे.

हेही वाचा : Samsung ने लॉन्च केला १५ हजारांपेक्षा कमी किंमतीमधील ‘हा’ स्मार्टफोन; ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मिळणार…

किंमत

वनप्लस ओपन फोल्डेबल फोन एमराल्ड डस्क (Emerald Dusk )आणि वोयजर ब्लॅक (Voyager Black) या दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. १६ जीबी आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १,३९,९९९ रुपये इतकी आहे. या फोनचा सेल २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

Story img Loader