वनप्लस कंपनी भारतात आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन ‘वनप्लस ओपन’ लॅान्च करणार आहे. वनप्लस ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. ज्यामध्ये नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स असतील. वनप्लस कंपनीने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून एक्स वर पोस्ट केले की, ”वनप्लसचा देशातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच लॉन्च होईल.” या प्रकारे वनप्लसने फोल्डबेल स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचे संकेत दिले आहेत. कंपनी कदाचित आपल्या १० व्या वर्धापनदिनाच्या दिवशी पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करू शकते. कंपनीने फोल्डेबल फोनचा अधिकृत टिझर लॉन्च केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनप्लस ने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन काही निवडक युट्युबर्स आणि पत्रकारांनाच दाखवले. या स्मार्टफोनमध्ये कदाचित कॅमेरा मोड्यूल असू शकते. रिपोर्ट्सनुसार, वनप्लस ओपन मध्ये गॅपलेस हिंज(Hinge) डिझाईन असू शकते जे वनप्लस आणि ओप्पो द्वारा एकत्रितपणे विकसित केले गेले आहे.

हेही वाचा : मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही; WhatsApp वरून बूक करता येणार तिकीट, ‘या’ आहेत सोप्या टिप्स

आपल्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये सिग्नेचर अलर्ट स्लायडर कायम ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या स्मार्टफोनला वनप्लस ओपन म्हणून ओळखले जाऊ शकते. काही लीक झालेल्या रिपोर्टनुसार, वनप्लस ओपनमध्ये हेसलब्लेड ट्युनिंगसह यामध्ये पेरिस्कोप झूम लेन्स देखील मिळू शकते. पेरिस्कोप झूम लेन्स असणारा हा स्मार्टफोन कंपनीचा पहिला फोन म्हणून ओळखला जाणार आहे.

वनप्लस ओपनमध्ये नुकताच लॉन्च करण्यात आलेल्या वनप्लस ११ R सोलर रेड फोनप्रमाणेच १८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळू शकते. तसेच यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC प्रोसेसरचा सपोर्ट मिळू शकतो. तसेच या वनप्लस ओपन स्मार्टफोनमध्ये ७.८ इंचाची प्रायमरी फोल्डेबल स्क्रीन आणि ६.३ इंचाची सेकेंडरी स्क्रीन मिळू शकते. ज्याचा रिफ्रेश १२० Hz इतका असू शकतो. कंपनी वनप्लस ओपनमध्ये कोणत्याही प्रकारचे वॉटर रेझिस्टन्स रेटिंग ऑफर करण्याची शक्यता नाही आहे. किंमतीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वनप्लस ओपन हा आतापर्यंतचा सर्वात महागडा फोल्डेबल स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. मात्र कदाचित हा Galaxy ZFold 5 च्या तुलनेत अधिक परवडणारा असू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One plus launch soon onle plus open foldable smartphone indian teaser launch check details tmb 01