आजच्या काळात स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज झाली आहे. आपली अनेक कामे या स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण होतात. आम्ही आमच्या नेहमीच्या “40,000 आणि रु. 60,000 पेक्षा कमी किंमतीचे सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन” याद्या काढून टाकत आहोत आणि त्याऐवजी, आम्ही आता “रु. 35,000 आणि 50,000 पेक्षा कमी किंमतीचे सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन” आणि त्यानंतर दर महिन्याला सर्वोत्कृष्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनची यादी करणार आहोत.

३५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमधील स्मार्टफोनमध्ये डिझाइन, फीचर्स आज आपण पाहणार आहोत. तुम्हाला जर का फोटोग्राफीची आवड असेल, गेमिंगची आवड असेल आणि त्यासाठी तुम्ही चांगला फोन शोधत असल्यास या लिस्टमधील फोन्स तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात. या लिस्टमध्ये OnePlus Nord CE 3 5G आणि अन्य काही फोन्सचा समावेश आहे.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?

हेही वाचा : Best Smartphones Under 15000: १५ हजार रूपयांमध्ये कोणकोणते स्मार्टफोन येतात माहितीये का? पाहा संपूर्ण यादी

OnePlus Nord CE 3 5G

केवळ ३५ हजार रुपयांच्या आतच नव्हे जर का तुमचे बजेट ३० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास तुमच्यासाठी OnePlus Nord CE 3 5G हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनला असलेला निळा रंग आणि याचे डिझाइन याचे आकर्षण वाढवतो. या शिवाय नॉर्ड सीई ३ ५ जी पूर्वीच्या तुलनेमध्ये काही आवश्यक अपडेट देण्यात आले आहेत. यामध्ये १२० Hz रिफ्रेस्ट रेट असलेली AMOLED स्क्रीन मिळते. ज्यामध्ये तुमच्या डोळ्यांच्या संरक्षणासाठी २१६० Hz PWM डोमिंगची सुविधा मिळते. तसेच हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 782G चिपद्वारे समर्थित आहे. याची बॅटरी लाइफ पण चांगली आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते.

OnePLus Nord 3 5 G

वनप्लस नॉर्ड ३ ५ जी या फोनमद्ये ६ .७४ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले मिळतो. त्याला १२० Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. यांच्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिल्क्सचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज आणि १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेच असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. याची किंमत देखील ३५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

iQOO Neo 7 Pro 5G

iQOO Neo 7 Pro मध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले मिळणार आहे. ज्याला १२० Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. या डिस्प्लेमध्ये फुल एचडी + रिझोल्युशन ऑफर करते. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटला सपोर्ट करतो. यामध्ये फोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑफर केले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित FuntouchOS 13 वर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. वर म्हटल्याप्रमाणे या फोनचा कॅमेरा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. iQOO Neo 7 Pro 5G हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपयांमध्ये करण्यात आली आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये इतकी आहे. ग्राहक हा फोन Fearless Flame (ऑरेंज) आणि Dark Storm (निळा) या रंगांमध्ये खरेदी करू शकतात. 

हेही वाचा : iQOO ने लॉन्च केला आपला ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन; केवळ ८ मिनिटांमध्ये होणार…, ऑफर्स एकदा बघाच

Motorola Edge 40 5G

मोटोरोलाने आपला नवीन फोन Motorola Edge 40 भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mah इतक्या क्षमतेची बॅटरी आहे. यामध्ये MediaTek Dimensity 8020 प्रोसेसर, 8GB LPDDR4X रॅम आणि ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये इतर अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आली आहेत. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सलची आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS मिळते. दुसरी लेन्स १३ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल आहे. फ्रंट मध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळते. सोबत 68W TurboPower वायर चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो. हा फोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत २९,९९९ रुपये आहे.