OnePlus Open Design Top Specification Price in Marathi : वनप्लस कंपनीने अखेर आपला ‘वनप्लस ओपन’ हा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. काल मुंबई येथे संध्याकाळी झालेल्या इव्हेंटमध्ये कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बाजारात वनप्लसने एक विश्वसनीय ब्रॅण्ड म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. कंपनीने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केल्यामुळे वनप्लसच्या ग्राहकांना देखील आनंद झाला आहे. या फोनचे स्पेशल फीचर्स , स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबद्दल जाणून घेण्यासही सर्वच जण उत्सुक आहेत. या फोनमधील असणाऱ्यासह काही टॉप फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

वनप्लस ओपनच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये कॉम्पॅक्ट डिझाइन देण्यात आले आहे. फोनची उंची १५३.४ मिमी इतकी आहे. तर फोनचे वजन हे जवळपास २३९ ग्रॅम इतके आहे. तसेच एमराल्ड डस्कचे वजन जवळपास २४५ ग्रॅम इतके आहे. वनप्लस ओपननमध्ये वापरकर्त्यांना ७.८२ इंचाचा फ्लॅक्सि फ्लयुड AMOLED प्रायमरी डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा ब्राइटनेस २८०० नीट्स इतका आहे. याशिवाय डिस्प्लेचे रिझोल्युशन २४४० x २२६८ पिक्सेल इतके आहे. तसेच फोनचा बाहेरील डिस्प्ले हा ६.३१ इंचाचा डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्युशन २ के इतके आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच हा फोन नवीन OxygenOS १३.२ वर आधारित अँड्रॉइड १३ वर चालतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?

हेही वाचा : OnePlus Open launch Video: भारतात लॉन्च झाला फोल्डेबल स्मार्टफोन; सेल्फी कॅमेऱ्यामध्ये मिळणार फेस अनलॉकसह ‘हे’ फीचर्स, किंमत…

OnePlus Open फोल्डेबल स्मार्टफोन : टॉप फीचर्स

कॅमेरा

वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यामध्ये सोनीचा LYT-T808 ‘पिक्सेल स्टॅक्ड’ (Pixel Stacked) CMOS सेन्सर OIS सह येतो. तसेच यामध्ये ६४ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा जोडण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वापरकर्त्यांना ६० FPS सह ४ के क्वालिटीमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करता येणार आहेत. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओसाठी २० मेगापिक्सलचा प्राथमिक व ३२ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा मिळणार आहे. फेस अनलॉक, नाइटस्केप सेल्फी, सेल्फी एचडीआर, टाइम लॅप्स, ड्युअल व्ह्यू व्हिडीओ आणि अन्य काही फीचर्स देण्यात आले आहेत.

सोनीचा पॉवरफुल कॅमेरा सेन्सर: वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोन हा सोनीचा LYT-T808 ‘पिक्सेल स्टॅक्ड’ (Pixel Stacked) CMOS सेन्सर असणारा पहिला स्मार्टफोन आहे. या कॅमेरा सेन्सरच्या मदतीने कमी उजेडामध्ये देखील चांगले फोटो काढता येऊ शकतात असा वनप्लस कंपनीचा दावा आहे. तसेच चांगल्या पोर्ट्रेट कॅमेरा प्रदर्शनासाठी फोनमध्ये एक नवीन आणि हेसलब्लेड पोर्ट्रेट मोड देखील देण्यात आला आहे. तसेच या कॅमेऱ्यामध्ये नाइटस्केप, डॉल्बी व्हिजन, स्मार्ट सिन रेकग्निशन, पोर्ट्रेट मोड, प्रो मोड, टिल्ट शिफ्ट मोड आणि अन्य फीचर्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा : iPhone 15 Pro फक्त ९३ हजारांमध्ये खरेदी करण्याची संधी, ‘या’ ठिकाणी मिळतोय आकर्षक डिस्काउंट

ट्रिपल spatial स्पीकर सेटअप: वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ट्रिपल spatial स्पीकर सेटअप देण्यात आला आहे. हा स्पीकर वापरकर्त्यांना प्रीमियम लॅपटॉपमधील स्पीकरप्रमाणेच आवाजाचा अनुभव देतो असा कंपनीचा दावा आहे.

OnePlus Open फोल्डेबल स्मार्टफोन : किंमत

वनप्लस ओपन फोल्डेबल फोन एमराल्ड डस्क (Emerald Dusk )आणि वोयजर ब्लॅक (Voyager Black) या दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. १६ जीबी आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १,३९,९९९ रुपये इतकी आहे. या फोनचा सेल २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

Story img Loader