बहुप्रतिक्षित वनप्लस १० प्रो चा लीक झालेला व्हिडीओ एका ऑनलाइन साईटवर पाहायला मिळाला आहे. या व्हिडीओमुळे या फोनची एक झलक बघायला मिळाली. अद्याप या गोष्टीची पुष्टी झाली नसली तरी या अधिकृत वाटणाऱ्या टीझर व्हिडीओचं ११ जानेवारीला अनावरण केलं जाणार असल्याचं बोललं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन १ प्रोसेसर असेल आणि तो अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.
वनप्लस १० प्रो हा स्मार्टफोन ५०००mAh बॅटरी आणि ८०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. वनप्लसच्या आतापर्यंतचे स्मार्टफोन ६५W चार्जिंगला सपोर्ट करणारे आहेत. ८०W फास्ट चार्जिंगमुळे वनप्लस १० प्रो हा स्मार्टफोन सर्वांत वेगवान चार्जिंग वनप्लस डिव्हाईस बनेल असं अहवालात म्हटलंय. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, या स्मार्टफोनमध्ये २K रिझोल्यूशनसह ६.७ इंचाचा एमोल्ड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तसेच, स्क्रीन वक्र असेल आणि वरच्या डाव्या कोपऱ्यात एक फ्रंट कॅमेरा असेल.
नवीन वर्षात नवीन फोन घ्यायचा विचार करताय? मग २० हजारापेक्षा कमी किमतीचे ‘हे’ ऑप्शन बघाच!
वनप्लस १० प्रो मध्ये ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, ५० मेगापिक्सेल दुय्यम कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल स्नॅपर मागील कॅमेरा मॉड्यूलमध्ये ठेवल्याचा दावा केला जात आहे. तर फ्रंट कॅमेरा ३२ मेगापिक्सेल असल्याचं सांगितलं जातंय.