OnePlus ने भारतात तिच्या कम्युनिटी सेलचे थर्ड एडिशन जाहीर केले आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, ऑडिओ प्रोडक्ट्स आणि स्मार्टवॉच यासारख्या OnePlus च्या प्रोडक्ट पोर्टफोलिओवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. OnePlus चा हा स्पेशल सेल सोमवारी ६ जूनपासून सुरू झाला आहे आणि १० जूनपर्यंत चालेल. या सेलमध्ये OnePlus 10R, OnePlus Nord CE 2 Lite, OnePlus Nord Buds आणि OnePlus TV Y1S Pro सारख्या कंपनीच्या नव्या स्मार्टफोनवरही सूट मिळेल. कंपनीने अनेक बँकांसोबत पार्टनरशीप करून सवलती आणि कॅशबॅकची घोषणा केली आहे.
OnePlus कम्युनिटी सेलमधील खरेदी दरम्यान, ग्राहकांना OnePlus.in, OnePlus Store App, Amazon आणि OnePlus Experience स्टोअर्समधून ९९९ रूपयांमध्ये Red Cable Care प्लॅन मिळू शकतो. वनप्लस रेड केबल केअर प्लॅनमध्ये १२० जीबी क्लाउड स्टोरेज, १२ महिन्यांची एक्सटेंडेड वॉरंटी आणि स्वतंत्र ग्राहक हेल्पलाइन यासारख्या ऑफर आहेत. OnePlus च्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या डील्सबद्दल जाणून घ्या.
सर्वप्रथम कंपनीच्या फ्लॅगशिप फोन OnePlus 10 Pro बद्दल जाणून घेऊया. या हँडसेटचा बेस व्हेरिएंट भारतात ६६,९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. पण सध्या सेलमध्ये ICICI आणि Citibank क्रेडिट आणि डेबिट कार्डने फोन घेतल्यावर ५००० रुपयांची सूट मिळणार आहे. OnePlus 10 Pro वर नो-कॉस्ट EMI ऑफर देखील आहे, ग्राहक इच्छूक असल्यास ९ महिन्यांच्या EMI वर सुद्धा फोन घेऊ शकतात.
आणखी वाचा ; Realme ने लॉन्च केला केला बजेट फ्री स्मार्टफोन, २५६ GB स्टोरेजसह जाणून घ्या किंमत आणि बरंच काही….
दुसरीकडे फास्ट चार्जिंग फीचर्ससह OnePlus 10R स्मार्टफोन ICICI आणि Citibank क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे ४००० रुपयांच्या सवलतीत मिळू शकतात. ICICI बँक कार्डसह ६ महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI प्लॅनवर OnePlus 10R घेण्याची संधी देखील आहे.
याशिवाय, OnePlus 9 Seires स्मार्टफोन OnePlus 9R, OnePlus 9RT आणि OnePlus 8T Citibank क्रेडिट कार्डसह ३ महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI वर मिळू शकतात. वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवरूनच नो नो कॉस्ट EMI व्यवहार शक्य आहे.
OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन्सना एक्सचेंज ऑफर अंतर्गत OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन्सच्या खरेदीवर ३००० आणि ५००० रूपयांचा बोनस डिस्काउंट मिळेल. दुसरीकडे, एक्सचेंज ऑफर अंतर्गत OnePlus 10R आणि OnePlus 10Pro स्मार्टफोन्स घेतल्यास अनुक्रमे २००० रुपये आणि ३००० रुपयांचा अतिरिक्त फायदे मिळेल.
OnePlus Nord 2 आणि OnePlus Nord 2 Pac-Man Edition स्मार्टफोन OnePlus कम्युनिटी सेलमध्ये फ्लॅट २००० आणि ६००० रूपयांची सूट घेऊन खरेदी करू शकता. OnePlus Nord CE 2 Lite बद्दल बोलायचे झाले तर हा फोन ICICI बँक कार्डने खरेदी केल्यास २००० रूपयांची सूट मिळेल. तसंच एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यास २००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. OnePlus Nord CE 2 स्मार्टफोन ICICI बँक कार्डस १,५०० रूपयांच्या सवलतीत उपलब्ध असेल.