Oneplus स्मार्टफोनची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. कारण या स्मार्टफोनचे फीचर्स सर्वांच्या पसंतीस उतरले आहेत. Oneplusने आतापर्यंत अनेक नवीन मॉडेल्स आणली आहेत. मागच्या वर्षी Oneplus ने भारतात 10R 5G लॉन्च केला होता. त्या वेळी या स्मार्टफोनची किंमत ४२,९९९ रुपये होती, पण आता तुम्ही कमी पैशात हा स्मार्टफोन विकत घेऊ शकता, कारण अॅमेझॉनवरून खरेदी केल्यास यावर आता मोठा डिस्काउंट सुरू आहे.
हेही वाचा : LinkedIn वर जॉब शोधणे होणार अधिक सोपे! या नव्या टूलमुळे फसवणुकीला लागणार लगाम, एकदा वाचाच…
अॅमेझॉन डिस्काउंट
अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत ३४,९९९ रुपये आहे पण यावर ४००० रुपयांचं डिस्काउंट कूपन मिळत आहे. सोबतच HDFC कार्ड्स किंवा EMIद्वारे खरेदी केल्यास १,००० रुपयांचे डिस्काउंटही मिळू शकते. ज्यामुळे हा OnePlus 10R 5G तुम्हाला अॅमेझॉनवर २९,४९९ रुपयांमध्ये मिळणार.
हेही वाचा : Metaनं आणलंय नवं AI मॉडेल, आता १,१०० पेक्षा जास्त भाषांमध्ये होणार ‘स्पीच टू टेक्स्ट’ आणि ‘टेक्स्ट टू स्पीच’
OnePlus 10R 5G स्मार्टफोन स्पेसिफिकेशन
या स्मार्टफोनला ६.७ इंचांचा फुल एचडी आणि AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय, ज्याचे रिझोल्यूशन १०८० इनटू २४१२ Pixel आणि रिफ्रेश रेट १२०Hz आहे. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसुद्धा आहे. याशिवाय यात ५,००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी ८० W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्टसुद्धा करते.
या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, दुसरा आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि दोन मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा दिलाय. सेल्फी आणि व्हिडीयो कॉलसाठी १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिलाय.