वनप्लस कंपनीने भारतात बाजारात एप्रिल महिन्यात आपला OnePlus 10R 5G सादर केला होता. आता फक्त पाच महिन्यांनंतर कंपनी २२ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात आपला प्राइम ब्लू एडिशन सादर करणार आहे.
वनप्लस 10R 5G मध्ये, तुम्हाला डायमेन्सिटी ८१००-मॅक्स प्रोसेसरसह १२०Hz रिफ्रेश रेटसह ६.७-इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले मिळत आहे. वापरकर्ते Amazon India वरून वनप्लस 10R 5G प्राइम ब्लू एडिशन सहज खरेदी करू शकतील.
वनप्लस 10R 5G चे स्पेसिफिकेशन
या नवीन एडिशनमधील फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फोनमध्ये मीडियाटेक Dimensity ८१००-मॅक्स प्रोसेसरसह 3D पॅसिव्ह कूलिंग टेक्नॉलजी आहे. फोनमध्ये ५०-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे आणि फ्रंटमध्ये १६-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
(आणखी वाचा : Vivo T1 5G चा नवा व्हेरिएंट भारतात सादर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत )
किंमत
Amazon India वरून वनप्लस 10R 5G प्राइम ब्लू एडिशन सहज खरेदी करता येऊ शकतो. याशिवाय OnePlus च्या वेबसाइटवरूनही खरेदी करता येईल. कंपनीने एप्रिल २०२२ मध्ये OnePlus 10R 5G लाँच केला होता, ज्याची सुरुवातीची किंमत ३८,९९९ रुपये होती. मात्र, नवीन एडिशनच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.