OnePlus कंपनी सध्या OnePlus 10T स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. असं सांगण्यात येतंय की, या वर्षी लाँच होणारा OnePlus हा शेवटचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. यानंतर, कंपनी २०२३ मध्ये OnePlus 11 सीरीज आणेल. तथापि, टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, वनप्लस आजकाल आणखी एका स्मार्टफोनवर काम करत आहे, जो OnePlus 10RT नावाने सादर केला जाऊ शकतो. या वनप्लस स्मार्टफोनची इंटरनल टेस्टिंग भारतात सुरू झाली आहे. OnePlus 10RT स्मार्टफोन मॉडेल क्रमांक CPH2413 सह ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध करण्यात आला आहे. टिपस्टर मुकुल शर्माने आगामी स्मार्टफोनची काही संभाव्य वैशिष्ट्ये देखील शेअर केली आहेत. OnePlus 10RT स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. वनप्लसचा हा फोन दोन कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाऊ शकतो. यासोबतच फोनमध्ये १२०Hz एमोलेड पॅनल देखील दिला जाईल. तर जाणून घेऊया OnePlus 10RT स्मार्टफोनबद्दल आतापर्यंतची माहिती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा