‘स्मार्टफोनचा कॅमेरा कमाल तर स्मार्टफोन धम्माल’ हा आजचा ट्रेंड. प्रत्येकालाच वाटतं की आपल्या फोनमध्ये सर्वच फिचर्स असायला हवं. त्यात कॅमेरा बेस्ट असला तर मग ग्राहकांसाठी ‘सोने पे सुहागा’. ग्राहकांची पसंती आणि अलिकडचा ट्रेंड ओळखून OnePlus या कंपनीनं OnePlus 11 5G स्मार्टफोनला लवकरच बाजारात आणण्याचं ठरवलयं. तत्पूर्वीच या स्मार्टफोनचे फीचर्स लीक झाले असून बाजारपेठेत या स्मार्टफोनच्या भन्नाट फीचर्सची चर्चा होऊ लागली आहे. ज्यात 2K रिझोल्यूशनस आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह भन्नाट फीचर्स पाहायला मिळणार आहेत.

काय असणार खास ?

Gizmochina च्या रिपोर्टनुसार, टिपस्टर डीसीएस ने OnePlus 11 चा कॅमेरा आणि डिस्प्ले विषयी माहिती दिली आहे. यात स्मार्टफोन 2Kरिझोल्यूशनसह वक्र डिस्प्लेसह येईल. स्क्रीनच्या वरच्या-डाव्या बाजूला एक पंच-होल कटआउट असेल. फोटोग्राफीसाठी आगामी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यामध्ये प्राथमिक सेन्सर ५० एमपी असेल. इतर सेन्सर्सप्रमाणे यात ४८ एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ३२ एमपी टेलिफोटो सेन्सर असेल. याशिवाय टिपस्टरने इतर फीचर्सची माहिती शेअर केलेली नाही.

आणखी वाचा : Jio आणि Airtel 5G सेवा लवकरच ‘या’ शहरांमध्ये मिळणार; पाहा यादी

स्मार्टफोनची स्क्रीन

OnePlus 11 स्मार्टफोनची स्क्रीन साइज ६.७ इंच असेल. यात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असेल. या व्यतिरिक्त, १००W फास्ट चार्जिंगसाठी समर्थनासह डिव्हाइसला ५०००mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, हा मोबाईल Android 13 आधारित OxygenOS 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. असा त्यांनी दावा केला आहे.

किती असणार किंमत?

लीक झालेल्या माहितीनुसार, हा फोन ८ जीबा १२८ जीबी आणि १२जीबी २५६ जीबी स्टोरेज मॉडेलमध्ये उपलब्ध असेल आणि त्याची किंमत प्रीमियम रेंजमध्ये ठेवली जाईल. आता लॉन्च बद्दल बोलायचे झाले तर, फ्लॅगशिप फोन पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केला जाऊ शकतो. लाँच करण्याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

तसेच, OnePlus 11 बरोबरच OnePlus 11R स्मार्टफोनवरही काम सुरू असून तो लाँन्चिंग मोडवर आहे. या हँडसेटमध्ये ६.६-इंचाचा FHD डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट १२०H असेल, अशी माहिती आहे.

Story img Loader